मालपे आगीत 17 स्कूटर बोटी आणि 7 महिंद्रा जीप जळून खाक

0
976


गोवा खबर:मालपे – विर्नोडा येथे असलेल्या गोवा दरबार या गोवा राज्य पर्यटन खात्याच्या हॉटेल तथा गेस्ट हाऊस परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून पडून असलेल्या 17 स्कूटर बोटी व सात महिंद्रा जीप गाडय़ा आगीत जळून खाक झाल्या. ही घटना शनिवारी  दुपारी दरम्यान घडली. मालपे – कोलवाळ या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जोरात सुरु असून रस्त्यासाठी लागणारी लाकडे कापून टाकली होती. या लाकडांना अज्ञाताने आग लावली. ती आग सुक्या गवताच्या साहाय्याने पुढे सरकत सरकत गोवा पर्यटन खात्याच्या जागेत पोहोचली. या जागेतील हॉटेल गोवा दरबार व गेस्ट हॉऊस गेली अनेक वर्षे बंद आहे. हॉटेलच्या बाजूलाच गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांसाठीच्या जीपगाडय़ा तसेच समुद्रामध्ये वापरण्यात येणाऱया स्कूटर बोटी पडून आहेत. रौद्ररुप धारण केलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी या जीपगाडय़ा व स्कूटर बोटी पडल्या.

विर्नोडा पंचायतीचे सरपंच भरत गावडे यांनी पेडणे अग्नाशामक दलाला घटने माहिती दिली. अग्नाशामक दलाची गाडी येईपर्यंत मोठय़ा प्रमाणात गाडय़ा व बोटी जळाल्या होत्या. त्यातच पेडणे अग्नाशामक दलाची मुख्य गाडी यापूर्वीच कोरगाव येथे गेल्याने दुसरी गाडी घेऊन जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारची वेळ व वाऱयाने आग पसरत चालली होती. त्यामुळे म्हापसा येथून अग्नाशामक गाडी मागविण्यात आली. सुमारे तीन तासानंतर जवानांना या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

या आगीतून पाच मोठय़ा बोटी व 20 जीप गाडय़ांसह 50 लाखांची मालमत्ता वाचविण्यात अग्नाशामक दलाच्या जवानांना यश आले.