मार्च महिन्यात ८ नवीन सहकार संस्थांची नोंदणी

0
378

 

गोवा खबर: सहकार खात्याने आतापर्यंत ४३८५ पतपुरवठा संस्था आणि बॅंकांची नावनोंदणी केली. मार्च महिन्यात ८ नवीन संस्थांची नोंदणी झाली. १७० बॅंक आणि ७३ पतपुरवठा संस्थेच्या सदस्यांची नावनोंदणी झाली. पतपुरवठा संस्थेचे आणि बॅंकेचे एकूण भागभांडवल रूपये २१.५५ लाख आणि १.९७ लाख रूपये एवढे आहे.

 पतपुरवठा संस्था आणि बॅंकांनी केलेल्या एकूण कर्जाची रक्कम रूपये ४८३६.०७ लाख आहे. गोवा राज्य सहकारी दूग्ध उत्पादक संघाने सुमारे १५,६९,१७९ लिटर स्थानिक दूध खरेदी केले आणि बाहेरील राज्यातून २,८२,३६५ लिटर दूध खरेदी केले.

सहकारी संस्थाना मार्च महिन्यात भागभांडवल, अनुदान वितरीत करण्यात आले नाही. ३ संस्थाना प्रशासकीय नियंत्रणाखाली ठेवण्यात आले. कोणत्याही संस्थेची पुनर्रचना करण्यात आली नाही. ७ निवडणूका घेण्यात आल्या आणि याच महिन्यात रूपये १.९७ लाख शिक्षण निधी म्हणून गोळा केले.