मार्च महिन्यात १९६ अपघातात २८ ठार

0
154

गोवा खबर:वाहतूक संचालनालयाव्दारे मार्च २०२० महिन्यात झालेल्या अपघातांचा आणि जारी केलेल्या चलन पावत्यांचा अहवाल देण्यात आला आहे.अहवालानुसार १९६ रस्त्यावरील अपघात झाले (उत्तर गोवा ९५ आणि दक्षिण गोवा १०१) त्यापैकी २५ प्राणघातक अपघात झाले. (उत्तर गोवा १५ आणि दक्षिण गोवा १०) ०५ गंभीर अपघात (उत्तर गोवा ०१ आणि दक्षिण गोवा ०४) २६ किरकोळ अपघात (उत्तर गोवा ११ आणि दक्षिण गोवा १५) आणि १४० विना दुखापत (उत्तर गोवा ६८ आणि दक्षिण गोवा ७२) झाले आहे.

एकूण २८ व्यक्तींचा  मृत्यू झाला. यापैकी १५ उत्तर गोव्यातील तर १३ दक्षिण गोव्यातील आहेत. १५ स्वार उत्तर गोवा-१२ आणि दक्षिण गोवा ०३, ०१ मागे बसलेला उत्तर गोव्यातील आहे. ०२ चालक, उत्तर गोवा ०१ आणि दक्षिण गोवा ०१ आणि ०५ पादचारी, उत्तर गोवा ०१ आणि दक्षिण गोवा ०४.

०८ जणांचा गंभीर अपघात झाला (उत्तर गोवा ०२ आणि दक्षिण गोवा ०६) तर ४० व्याक्तींना किरकोळ जखमा झाल्या (उत्तर गोवा १४ आणि दक्षिण गोवा २६).

मार्च २०२० च्या महिन्यात वाहतूक अधिकाऱ्यांकडून १३७८ चलने देण्यात आली.