मायकल लोबो यांच्या व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे जमीन हस्तगत करण्याचे षडयंत्र : आप

0
302
गोवा खबर : आम आदमी पक्षाने आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सादर केलेल्या निवेदनात कळंगुट गावाला दिलेला शहरी दर्जा त्वरित रद्द करण्याची मागणी केली असून, निवेदनाच्या प्रती सचिव  महसूल, अपर सचिव महसूल व उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्या आहेत.
या निवेदनात असे दिसून आले आहे की,कळंगुटला शहरी दर्जा जाहीर करण्याच्या निर्णयाने, या निर्णयाला पूर्णपणे विरोध करणारे आणि त्यावर आक्षेप घेताना एकमत असलेल्या कळंगुट येथील ग्रामस्थांना धक्का बसला आहे.
आपने याकडे लक्ष वेधले की याचा दूरगामी परिणाम होईल, ज्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किनारी नियमन क्षेत्र उंच भरतीची रेषेपासून २०० मीटर वरुन केवळ ५० मीटर वर येईल. समुद्र किनारी वातावरणाचा नाश करण्याबरोबरच जमीन ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला वाव मिळेल.
त्यांनी हे निदर्शनास आणून दिले की, हा निर्णय स्थानिक आमदार मायकेल लोबो हॉटेल्स शी निगडित आहे, कारण  सीआरझेड कायद्याशी माइकेलचा असलेला विरोधाभास नेहमीच दिसून आला आहे आणि त्यांना आठवण करून दिली कि, यापूर्वी मायकल यांनी कळंगुटला नियोजन व विकास प्राधिकरणाच्या कक्षेत आणण्यासारखे अनेक प्रयत्न केले आहेत.
‘आप’ने मुख्यमंत्र्यांना विचारले की, ही अधिसूचना पक्षाचे आमदार आणि मंत्री यांना प्रतिबंधित विकासाच्या नियमांपासून मुक्तता मिळावी आणि मोठ्या प्रमाणात जमीन हडप करण्याची संधी निर्माण व्हावी, यासाठी आणली आहे का.
याशिवाय त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, शहरी दर्जामुळे समुद्रकिनार्‍यावरील शॅक धोरण रद्द करेल आणि पारंपारिक मच्छीमार समुदायाच्या कारभारावर विपरित परिणाम करेल, ज्यायोगे स्थानिक अर्थव्यवस्था नष्ट होईल आणि वाढीव कर आणि दर वाढीचे ग्रामस्थांवर ओझे पडेल.
आपने म्हटले आहे की, सरकारने एकतर्फी बाजूने पर्यटनाला चालना दिल्यामुळे महिलांना रात्रीच्या वेळी कळंगुटमध्ये मुक्तपणे फिरने कठीण झाले आहे आणि सरकारला कळंगूटला जुगार, ड्रग्ज आणि  वेश्याव्यवसायाचे केंद्र बनवायचे आहे का, असा सवाल केला आहे.
त्यांनी ग्रामपंचायतींचा सल्ला घेतल्याशिवाय किंवा ग्रामसभेचे आयोजन न करुन ग्रामस्थांचे म्हणणे जाणून न घेताच हा निर्णय घेतल्याबद्दल सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि याद्वारे कळंगुटकरांना पूर्णपणे संपविण्यात येईल असा इशारा दिला.
“मायकेल लोबोसाठी पैसे कमविताना कळंगुटकरांची जमीन बळकावणे आणि त्यांना हाकलून लावण्याच्या प्रयत्नाशिवाय हे दूसरे काहीच नाही,”असे आपचे प्रवक्ते आणि कळंगुटचे नेते मॅन्युअल कार्दोजो म्हणाले.