- प्रवाशांना जून ते सप्टेंबरअखेर पर्यंत मान्सूनमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचा सल्ला दिला आहे.
- जीवरक्षक दैनंदिनी हवामानाचे निरिक्षण करत आहेत. त्यांना उग्र हवामानात देखील बचावासाठी प्रशिक्षण दिले जाते
- समुद्रावर गेलेल्या लोकांनी मुलांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे व पाण्याला ओहोटी असली तरीदेखील त्यांना एकटे पाण्यात सोडू नका
- पुढील काही महिन्यांत हवामानाची परिस्थिती पाहून दृष्टी प्रवाशांसाठी काही सेवा चालू करेल ज्यात चालायला मिळेल पण पोहण्याला बंदी असेल.
गोवाखबर: गोव्याच्या विविध भागांमध्ये मध्यम व जोरदार पाऊस खूप जोमाने चालू आहे अशावेळी राज्य नियुक्त व्यावसायिक जीवरक्षक एजन्सी दृष्टी मरिन यांनी प्रवाशांना जून ते सप्टेंबर अखेरपर्यंतच्या मान्सूनमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचा सल्ला दिला आहे.
मान्सून गोव्यात दाखल झाला आहे. त्यानंतर गोव्यात पुढील काही आठवड्यात तीव्र असेल. याआठवड्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व वर्षाव झाला. ज्यात रिमझिम वर्षापासून मोठ्या पाऊसाने हजेरी लावली. मान्सूच्या सुरुवातीला जोरदार वाऱ्यासह वीज गडगडाट होईल.
दृष्टीचे 600 सामर्थ्यवान जीवरक्षक समुद्रकिनाऱ्यांवर पूर्ण वर्षभर असतात. आगामी मान्सून आणि सध्याच्या हवामानामुळे सर्व सुमद्रकिनाऱ्यांवर दृष्टीच्या देखरेखीखाली रेड फ्लॅग्स लावले आहेत जे न पोहण्यासाठी असेलेल्या जागांबद्दल सूचित करतात.
दृष्टी मरिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवि शंकर म्हणतात, “गोव्यात मान्सूनपूर्व पावसाचा वर्षाव झाला आहे. मागील काही दिवसांत किनाऱ्यांवर मजबूत वारा आणि पाऊस पडत आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रवाशांना समुद्रामध्ये न उतरण्याचा सल्ला देतो. आम्ही सर्व समुद्रांकिनाऱ्यांवर रेड फ्लॅग्स लावले आहेत जे दर्शावते कि तो भाग पोहण्यासाठी अयोग्य आहे. पाण्यात चालून न जाण्याचा सल्लादेखील देतो. आमचे जीवरक्षक किनाऱ्यांवर हवामानाची स्थितीदेखील पाहतो. त्यांना उग्र हवामानात देखील बचावासाठी प्रशिक्षण दिले जाते.” प्रवासी त्यात चालू शकतात.
पुढील काही महिन्यांत हवामानाची परिस्थिती पाहून दृष्टी प्रवाशांसाठी काही सेवा चालू करेल ज्यात चालायला मिळेल पण पोहण्याला बंदी असेल. रवि शंकरने सांगितले, “गोव्याची किनारपट्टी अतिशय जटील असल्यामुळे मॅपिंग करणे आवश्यक आहे. जर हवामान परिस्थिती अनुकुल असेल तर प्रवाशांना पाण्यात जायचे असेल अशांसाठी आम्ही काही ठिकाणांवरील झोन्स उघडे करणार आहोत. लाल व पिवळ्या ध्वजातून अशा झोन्सची ओळख पटेल व दररोज परिस्थिती अनुकुल असल तरच आम्ही हे करू. तथापि पाण्याखालील करंट्स व रिप टाइड्यमुळे अशा ठिकाणांवर पोहण्याची बंदी असेल.”
दृष्टी समुद्रावर गेलेल्या लोकांना मुलांवर बारकाईने लक्ष ठेवून पाण्याला ओहोटी असली तरीदेखील त्यांना एकटे न सोडण्याचा सल्ला दिला आहे.
दृष्टी मरिन दैनंदिनी हवामान खात्यासह हवामानाविषयक परिस्थितीवर लक्ष ठेवते. अलिकडेच त्यांनी ‘मेकुणू’वादळाची माहिती दिली होती.
गोवा सरकार मान्सूसाठी समुद्रावर पोहण्यासाठी व वेगवेगळ्या जलक्रिडावर (वॉटर स्पोर्ट) जून ते ऑगस्ट तात्पुर्ती बंदी घालतात कारण या दिवसात समुद्र खवळलेला असतो शिवाय पाऊसामुळे लाटांचा वेगदेखील अधिक असतो. 1 जून ते 31 जुलैपर्यंत असा 61 दिवसांचा मासेमारी बंदीचा काळ पाळला जातो ज्यात सुमारे 1,500 ट्रॉलर्स आपले जाळे काढून ठेवणार आहेत.
#ListenToYourLifeguard:
गोव्याच्या जीवरक्षक एजन्सी दृष्टीकडून संरक्षणासाठी मान्सूनसाठीच्या टीप्स
- जे समुद्रावर जात आहेत त्यांनी पाण्यापासून किमान 10 मी. अंतर ठेवावे व जीवरक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
- जर ओहोटी असेल किंवा पाऊस नसेल तर गुडघ्याच्या वर असलेल्या पाण्याच्या ठिकाणी किंवा लाल व पिवळा ध्वज चिन्हांकित केलेल्या ठिकाणी जाऊ नये.
- समुद्रावर गेलेल्या लोकांनी मुलांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे व पाण्याला ओहोटी असली तरीदेखील त्यांना एकटे पाण्यात सोडू नका
- दुपारी 12 ते 4 पर्यंत समुद्रात जाऊ नये. दुपारच्यावेळी समुद्र खवळलेला असतो कारण यावेळी वाऱ्याची गती जास्त असते.
- जीवरक्षक किंवा लोकं नसलेल्या समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे. याव्यतिरिक्त ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे अशा समुद्रकिनाऱ्यावर जावे व एकटे पोहोणे टाळावे. याठिकाणी जीवरक्षक असतात.
- ज्यावेळी जीवरक्षक जीपवर असलेल्या पब्लिक एड्रेस सिस्टमद्वारे लोकांना सूचना देतात त्यावेळी सतर्क राहणे गरजेचे आहे.
- गडगडाटासह वीज जेव्हा येते अशावेळी समुद्रावर जाणे टाळावे कारण वीजेमुळे दोका निर्माण होऊ शकतो.
- ऑहोटीवेळी दगडांवर जाऊ नये कारण मान्सूनमध्ये दगडांवर घसारयाला होते.
- जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या महिन्यांच्या कालावधीत समुद्रकिनाऱ्यावर जलक्रिडा करणे चुकीचे आहे कारण जरी समुद्र शांत वाटत असेल तरीही अचानक मोठी लाट आपल्यावर येऊन खोल पाण्यात नेऊ शकते.
- जर मद्य केलेले असेल तर पाण्यात कसेच जाऊ नये.
- नेहमी समुद्राच्या प्रवेशद्वारांवर संरक्षणासाठी असलेली चिन्हे वाचून जावी.