माझा बिझनेस :पणजीत टॅक्सी गो सिटीची टॅक्सी सेवा सुरु

0
1075

माझा बिझनेस
पणजी:खाजगी टॅक्सी चालकांकडून होत असलेली प्रवाशांची लूट रोखण्यासाठी तरुण उद्योजक रघु शेट्ये यांनी पुढाकार घेऊन चंदन ग्रुपतर्फे सुरु केलेल्या टॅक्सी गो सिटी या स्वस्तामधील टॅक्सी सेवेचे उद्धाटन आज स्वातंत्र्य सैनिक तथा रीझ क्लासिक समूहाचे अध्यक्ष रोहिदास(दादा)देसाई यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले.यावेळी उद्योजक मांगिरिश पै रायकर,रघु शेट्ये उपस्थित होते.
टॅक्सी गो सिटी सेवेबद्दल बोलताना शेट्ये म्हणाले,कोणाला त्रास द्यायला आम्ही ही सेवा सुरु केलेली नाही.सर्वसामान्य लोकांची होणारी लूट लक्षात घेऊन ही सेवा सुरु करण्यात आली आहे.वयोवृद्ध,महिला यांना या सेवेचा फायदा होणार आहे.आमच्या कडे सध्या 30 टॅक्सी असून पहिल्या टप्प्यात पणजी शहरात ही सेवा दिली जाणार आहे.त्याला मिळणारा प्रतिसाद बघून इतर ठिकाणी या सेवेचा विस्तार केला जाणार आहे.199 रूपयांमध्ये ग्राहकाणा 45 मिनिटे टॅक्सी मधून 10 किमी प्रवास करता येणार आहे.10 किमी नंतर 20 रुपये प्रति किमी दराने बिल आकारले जाणार आहे.सरकार,वाहतूक खाते,पोलिस आणि टॅक्सी चालकांचे सहकार्य लाभले तर ही सेवा गोव्यात लोकप्रिय होईल यात शंका नाही’
या टॅक्सी मध्ये जीपएस आणि कॅमेरा बसवाला जाणार असून टॅक्सी गो सिटी द्वारे होणारा प्रवास सुरक्षित होईल याची खबरदारी चंदन ग्रुप घेणार असल्याचे शेट्ये यांनी स्पष्ट केले.
*अशी मिळवा टॅक्सी गो सिटीची सेवा*
08326711111 या नंबर वरुन कॉल करून तुम्ही टॅक्सी बोलवू शकता. सध्या फक्त पणजी मध्ये ही सेवा मर्यादित असणार आहे.