माझा बिझनेस:डीएनए इंटरनेटसेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

0
921

माझा बिझनेस
पणजी:डीएनए या इंटरनेट सेवा देणाऱ्या आस्थापनाचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयटी मंत्री रोहन खवंटे, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर,विजय पै खोत, चंदन ग्रुपचे रघु शेट्ये उपस्थित होते.
महाराष्ट्रामध्ये ब्रॉडबँड सेवेत नाव कमावलेली डिजिटल नेटवर्क असोसिएट ही संस्था गोव्यात ग्राहकांना माफक दरात वेगवान इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी सज्ज आहे.या सेवेचे दर गोव्यात सर्वात स्वस्त असून आम्ही गोव्याचे मार्केट लवकरच काबिज करू असा विश्वास शेट्ये आणि खोत यांनी व्यक्त केला.यावेळी महाराष्ट्रातील भोईसरचे आमदार क्षितिज ठाकुर विशेष निमंत्रीत म्हणून उपस्थित होते.