मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी मताधिक्य वाढेल:शिरोडकर

0
783
गोवा खबर:शिरोडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत सुभाष शिरोडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.गेल्या वेळपेक्षा यावेळी मताधिक्य जास्त घेऊन विजयी होइन, असा विश्वास शिरोडकर यांनी यावेळी व्यक्त केला.
शिरोडकर यांनी कामाक्षी देवीचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज सादर केला.मुख्यमंत्री प्रमोद सावंत,भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरल्या नंतर पत्रकारांशी बोलताना शिरोडकर म्हणाले,शिरोडा मतदारसंघातील जनतेने माझे काम पाहिले आहे.गेली कित्येक वर्षे आमदार,मंत्री म्हणून मी शिरोडावासियांची सेवा केलेली आहे.
राज्यात आणि केंद्रात भाजपने केलेली विकास कामे लोकांना पसंत असल्याने यावेळी माझा जनाधार आणखी वाढला असल्याचा दावा शिरोडकर यांनी यावेळी केला.
गेली कित्येक वर्षे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असलेल्या सुभाष शिरोडकर यांनी शिरोडा मतदारसंघात अत्याधुनिक शिक्षण सुविधा उभरण्यात मोलाचे योगदान दिले आहे.शिरोडकर यांनी उभरलेल्या शिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडले असल्याने शिरोडकर यांचा विजय निश्चित असल्याचा दावा यावेळी उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.