माओवादी हिंसाचारात घट

0
942

गोवाखबर:माओवादी नक्षलवाद्यांशी लढण्याकरिता 2015 पासून केंद्रीय गृहमंत्रालय “राष्ट्रीय धोरण आणि कृती धोरण” राबवत आहे. हिंसाचार खपवून न घेणे आणि गरीब, वंचित घटकांपर्यंत विकासाची फळे पोहोचवण्यासाठी विकास कार्यक्रमांना जोरदार चालना ही नव्या धोरणाची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत.

गेल्या चार वर्षात परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असून वर्ष 2013 च्या तुलनेत 2017 मध्ये माओवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये 20 टक्के आणि मृत्यूच्या प्रमाणात 34 टक्के घट झाली आहे.

डाव्या अतिरेकी विचारसरणीच्या हिंसाचाराचा प्रसार 2013 मध्ये 76 जिल्ह्यात होता तो कमी होऊन 2017 मध्ये 58 जिल्ह्यांवर आला आहे. मात्र आता डाव्या अतिरेकी विचारसरणीने काही नव्या जिल्ह्यांमध्ये हातपाय पसरण्यावर लक्ष केंद्रित‍ केले आहे. या पार्श्वभूमीवर केरळ,कर्नाटक आणि तामिळनाडू या तिन्ही राज्यांमधल्या एकमेकांना लागून असलेल्या आदिवासी भागांचा आणि केरळमधल्या तीन जिल्ह्यांचा एसआरई अर्थात सुरक्षा संबंधित खर्च योजनेत समावेश करण्यात आला आहे. या भागात हिंसाचाराच्या कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.