माऊंट इलब्रूससाठी गिर्यारोहक चमूला श्रीपाद नाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा

0
823

 

 गोवा खबर:केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज नवी दिल्ली येथे हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या चमूला हिरवा झेंडा दाखवला. हा चमू रशियातील माऊंट इलब्रूससाठीच्या चढाईसाठी आज रवाना झाला.

हिमालयीन गिर्यारोहण संस्थेचे प्राचार्य ग्रूप कॅप्टन जयकिशन यांच्या नेतृत्वाखाली आठ गिर्यारोहकांचा चमू 15 ऑगस्टला 73 व्या स्वातंत्र्यदिनी इलब्रूसशिखरावर तिरंगा ध्वज फडकवणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाला योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा चमू पर्वतशिखरावर योगासने करणार आहे. श्रीपाद नाईक यांनी चमूला नियोजीत मोहीम यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.