मांद्रेतून अपक्ष उमेदवार जित आरोलकर यांचा उमेदवारी अर्ज सादर

0
731

निवडून आलो तर  मतदारसंघातील सर्व मतदार नेते :आरोलकर

गोवा खबर(पेडणे ):मांद्रे मतदारसंघात लोक पूर्णता कंटाळलेले आहे. माजी आमदार दयानंद सोपटे यांनी जो निर्णय घेऊन काँग्रेस मधून भाजप पक्षात पदार्पण केले, त्यामुळे माद्रे मतदारसंघावर पोटनिवडणुका लादली आहे. यांच्या विरोधात मांद्रे मतदार संघात तमाम जनता उभी राहिली आहे, की कुठल्याही परिस्थितीत मांद्रे मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजय होता कामा नये. आपला नारा आहे ” हर हर नेता हर एक नेता” आपण या निवडणुकीत निवडून आलो तर यापुढे एकच नेता नसून या मतदारसंघातील सर्व मतदार राजा हा नेता असेल असे मत अपक्ष उमेदवार जित आरोलकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मांद्रे मतदार संघातून अपक्ष उमेदवार जित आरोलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज पेडणे उपजिल्हाधिकारी शेटकर यांच्याकडे सादर केला . यावेळी माजी आमदार परशुराम कोटकर, जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर, श्रीमती मांजरेकर ,पार्से माजी सरपंच देवेंद्र प्रभुदेसाई ,उपसरपंच अजित मोरजकर ,तुये माजी सरपंच उल्हास नाईक ,किशोर नाईक ,माद्रे पंच आमरोज फेर्नांडिस ,हरमल पंच गुणाजी ठाकूर ,पंच प्रवीण वायगणकर ,पंच सुभाष आसोलकर ,प्रकाश कांबळी ,सिद्धी शेट्ये आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

जितेगा गा भाई जितेगा जित भाई जितेगा ,हा आवाज कुणाचा हा आवाज जित आरोलकर यांचा ,उदर्गत करतेले उदर्गत करतेले मांद्रेची उदर्गत करतेले ,जित आरोलकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ,अश्या घोषणा शेकडो नागरिकांनी देऊन पेडणे बाजारपेठ दुमदुमून सोडली ,शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रथम मांद्रे मतदार संघातून अपक्ष उमेदवार जित आरोलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज पेडणे उपजिल्हाधिकारी  शेटकर यांच्याकडे सुपूर्द केला.

मांद्रे मतदार संघाचे काँग्रेस आमदार दयानंद सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे 23 एप्रिल रोजी पोट निवडणूक होत आहे. त्यासाठी मांद्रे मतदार संघातून सर्वात प्रथम अपक्ष उमेदवार जित आरोलकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.

आज अपक्ष उमेदवार जित आरोलकर यांनी  सर्वात प्रथम आपल्या मूळ देवतेचा ग्राम देवता आणि मांद्रे मतदार संघातील सर्व प्रमुख देवतांचे दर्शन घेतल्यानंतर पेडणे येथील श्री भगवती देवीच्या चरणी श्रीफळ ठेवून त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज  मोठ्या संख्येने त्यांचे समर्थकाच्या उपस्थित सादर केला.

सकाळ पासून जित आरोलकरच्या समर्थकांनी पेडणेत गर्दी केली होती ,भगवती मंदिरात श्रीफळ ठेवल्यानंतर भगवती मंदिर ते पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत समर्थक जित सोबत चालत आले ,पायी चालत असताना आरोलकर यांच्या समर्थकांनी घोषणा देत असताना जित आरोलकर शिवाय पर्याय नाही ,जितेगा भाई जीतेगा जित भाई जितेगा अश्या घोषणा देण्यात आल्या .