मांद्रेच्या विकासासाठी सोपटे हेच एकमेव पर्याय: गुदींन्हो

0
629
गोवा खबर: दयानंद सोपटे यांना पुन्हा एकदा आमदार करून मांद्रेचा विकास साध्य करा असे प्रतिपादन पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले .
पार्से पंचायत सभागृहात मांद्रे मतदार संघाचे भाजप उमेदवार दयानंद सोपटे याच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कोपरा बैठकीत ते बोलत होते यावेळी  दयानंद सोपटे, माजी आमदार दामू नाईक,महिला मोर्चा अध्यक्ष सुलक्षणा सावंत, मांद्रेचे प्रभारी गोरख मांदेकर,पार्सेच्या सरपंच प्रगती सोपटे,पंच ममता सातार्डेकर,प्रेमनाथ कानोलकर ,मांद्रेचे सरपंच प्रदीप हडफडकर,उपसरपंच डेनिस ब्रिटो,हरमलचे पंच अनंत गडेकर ,तुयेचे पंच सुहास नाईक,विर्नोडाचे पंच शैलेंद्र परब ,मांदे मतदार संघ भाजप अध्यक्ष मधुकर परब ,सचिव सुदेश सावंत,महिला मोर्चा अध्यक्ष नयनी शेटगावकर ,दीपा तळकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री  गुदिन्हो  म्हणाले, मनोहर पर्रीकर यांनी देशाचे संरक्षण मंत्री असताना जसा देश वाचवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केला त्याप्रमाणे मुख्यमंत्री असताना सरकार वाचवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करून सरकार वाचवले. त्यासाठी मांद्रेतून दयानंद सोपटे आणि शिरोडयातून सुभाष शिरोडकर यांनी मतदारावर विश्वास ठेऊन आमदारकीचा त्याग केला. त्यांना त्यांची आमदारकी परत देणे तुमचे आमचे कर्तव्य आहे. त्याच प्रमाणे देश विदेशात भारतीयांची मान  उंचावणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी श्रीपाद नाईक यांना निवडून देऊया.
 60 वर्षे सत्तेवर राहून सुद्धा  काँग्रेसने विकासापासून दूर ठेवले तर विकास काय असतो हे  भाजपने अल्पावधीत देशवासियांना दाखवून दिले. देशात डीजीटल क्रांती केली. स्वाभिमानाने कसे जगावे हे शिकवले. यापुढे हा स्वाभिमान जागृत ठेऊन  विकासाची घोड दौड चालू ठेण्यासाठी केंद्रात भाजपला विजयी करा. गोव्यात स्व.मनोहर पर्रीकर यांच्या लोककल्याणकारी राज्याची स्थापना करण्यासाठी तसेच युवकांचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी सोपटे यांना विजयी करा,असे आवाहन दामू नाईक यांनी केले.
महिला मोर्चा अध्यक्ष सुलक्षणा सावंत म्हणाल्या ,भाजप ने समाजातील शेवटच्या माणसा पर्यंत लोककल्याणकारी योजना पोचवल्या. देशाची सुरक्षा मजबूत केली. मात्र 60 वर्षे आपण आपला देश ज्या काँग्रेस  पक्षाच्या दावणीला बांधला त्या गांधी घराण्याने देशाची वाट लावली.  130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचा नेता कसा असावा तसेच आपला देश यापुढे एखाद्याच्या दावणीला बांधावा का? याचा विचार आपण करायला हवा देश मजबूर न करता  देशाला मजबुती आणणाऱया मोदीच्या सोपवायला हवा.
सावंत म्हणाल्या ,सध्याच्या काळात आमदारकीचा त्याग म्हणजे साधी गोष्ट नाही ती धमक असावी लागते आणि मांद्रेच्या विकासासाठी ते धेर्य आपल्या आमदाराने दाखवले आहे. त्यांना पुन्हा निवडून देणे सगळ्यांचे कर्तव्य आहे त्यासाठी  भाजप कार्यकर्त्यांनी चौकीदाराप्रमाणे डोळ्यात तेल घालून काम करायला हवे.  स्व.मनोहर पर्रीकर यांचे अधुरे स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धाजली वाहण्यासाठी एक एक मत भाजपला मिळवून द्यायला हवे.
 सोपटे म्हणाले, आपण मांद्रेच्या विकासाठी आमदारकीचा त्याग केला तो सुद्धा माझ्या मतदारावर विश्वास ठेऊन आणि त्याच विश्वासाने माझे मतदार मला निवडून देतील याची मला खात्री आहे.
 आपण 20 वर्षे राजकारनात आहे मात्र कधीही स्वार्थाचे राजकारण केले नाही विकास आणि रोजगार हा माझ्या राजकारणाचा केंद्र बिंदू आहे मतदारांच्या मताची पैशात किमत करणाऱ्यांनी आम्हाला नीतीमत्तेचे धडे देऊ नये ज्या मनोहर भाईनी आपल्याला राजकारणात आणले त्यांचे अधुरे स्वप्न साकार करण्यासाठी आपण मला साथ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी दीपा तळकर,प्रगती सोपटे,सुदेश सावंत ,मधुकर परब यांची भाषणे झाली सभेत सोपटे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.सागर तिळवे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.