मांडवी, झुआरी नदीत वाजपेयींच्या अस्थिकलशांचे विसर्जन

0
1158

 

 

 

गोवा खबर:माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या  अस्थिकलशाचे विसर्जन पणजी येथील फेरीधक्याजवळ मांडवी नदीत करण्यात आले. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, इतर पदाधिकारी, आमदार, कार्यकर्ते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दक्षिण गोव्यात कुठ्ठाळीतील फेरी धक्याजवळ झुआरी नदीत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते कलशाचे विसर्जन करण्यात आले.

विसर्जनासाठी ‘विहान प्रुझ’ या बोटीची व्यवस्था करण्यात आली होती. 23 व 24 ऑगस्ट असे दोन दिवस उत्तर गोव्यातील प्रमुख शहारातून तसेच प्रमुख गावातून हा अस्थिकलश जनतेच्या दर्शनासाठी फिरवण्यात आला. त्यावेळी अनेक लोकांनी दर्शन घेतले.

दक्षिण गोव्यात फिरविण्यात आलेल्या अस्थिकलशाचे कुठ्ठाळी  दाबोळी, वास्को व मुरगाव मतदारसंघात नागरिकांनी दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास कुठ्ठाळीतील फेरी धक्याजवळ झुआरी नदीत या अस्थींचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले. खासदार नरेंद्र सावईकर, आमदार एलिना साल्ढाणा, आमदार नीलेश काब्राल, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी आमदार विजय पै खोत, दामू नाईक तसेच असंख्य कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.