मांडवीवरील तिसऱ्या पुलाचे उद्धाटन 12 रोजी अशक्य:सिद्धार्थ

0
1752
गोवा खबर: मांडवी नदीवर उभारल्या जात असलेल्या तिसऱ्या पुलाचे उद्धाटन 12 जानेवारी रोजी करणे शक्य  होणार नाही.12 रोजी भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत असल्याने सगळे नेते गोव्याबाहेर असणार आहेत.मात्र आम्ही 10 जानेवारी पर्यंत पुलाचे काम पूर्ण करणार असून त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीख मिळताच पुलाचे उद्धाटन केले जाईल, अशी माहिती गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी आज येथे दिली.

डिचोली अर्बन बँकेच्या मोबाइल अॅपचे लॉन्चिंग केल्या नंतर पत्रकारांशी बोलताना कुंकळ्येकर म्हणाले,12 रोजी पंतप्रधान आणि भाजपचे गोव्यातले सगळे नेते दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये व्यस्त असल्याने 12 रोजी पुलाच्या उद्धाटनाची शक्यता फारच कमी आहे.आम्ही 10 जानवारी पर्यंत पुलाचे काम पूर्ण करणार आहोत.12 नंतर जेव्हा पंतप्रधान मोदी यांची तारीख मिळेल त्यावेळी पुलाचे उद्धाटन केले जाईल.
काँग्रेसने केलेल्या आरोपाबाबत बोकताना कुंकळ्येकर म्हणाले,आम्ही पूलाच्या सुरक्षे बाबत सर्व निकष पूर्ण केले असल्याने काँग्रेस करत असलेल्या आरोपात काही तथ्य नाही.तज्ञांच्या  मार्गदर्शनाखाली काम सुरु असून सर्व निकष पूर्ण करुनच काम केले जात आहे.त्यामुळे काँग्रेसने केलेले आरोप दखल पात्र ठरत नाहीत.
खाण अवलंबीतांनी पुलाच्या उद्धाटनास येणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना खाणी सुरु करण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना केल्या गेल्या नाही तर काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे त्याबद्दल बोलताना कुंकळ्येकर म्हणाले,खाणी बंद असल्याने खाण अवलंबीतांवर उपासमारीची पाळी आली आहे.त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो.मात्र खाणी सुरु व्हाव्यात यासाठी वरिष्ठ पातळीवर घडामोडी सुरु आहेत.त्यातून मार्ग निघण्याची शक्यता असताना असे पाउल उचलले जाऊ नये असे वाटते.एरव्ही त्यांच्या आंदोलनाला आमचा सदैव पाठिंबाच आहे.