मांडवीवरील तिसऱ्या पुलाच्या पिलरला लागलेली आग आटोक्यात

0
838

गोवा:मांडवी नदीवरील काम सुरु असलेल्या तिसऱ्या पुलाच्या एका पिलरला भर दुपारी आग लागली.आगीचे वृत्त समजताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.आग कोणत्या कारणामुळे लागली याचा अहवाल गोवा साधन सुविधा महामंडळाने पुलाच्या कंत्राटदाराकडून मागवला आहे.भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल असे गोवा साधन सुविधा महामंडळाने स्पष्ट केले आहे.यापूर्वी पुलाच्या कामाच्या ठिकाणी क्रेन कोसळून अपघात झाला होता.