मांडवीच्या तिसऱ्या पूलामधील 100 फूटी ध्वाजाचे रोहण उत्साहात

0
762
गोवा खबर:देशातील तिसऱ्या मोठ्या केबल स्टेड पूलाच्या मध्ये उभारलेल्या 100 फूटी ध्वजाचे आज उत्साहात रोहण करण्यात आले.मांडवी नदी वरील तिसऱ्या पुलाच्या मध्ये मेरशीच्या दिशेने हा ध्वज उभारण्यात आला आहे.
गोवा साधन सुविधा विकास महामंडळासाठी एल अॅण्ड टी कंपनीने हा पुल उभारला असून उद्या सायंकाळी 7 वाजता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी  आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते या पुलाचे उद्धाटन केले जाणार आहे.
आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य राखून गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या हस्ते 100 फूटी ध्वजाचे रोहण करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी रंगीत झेंडे घेऊन बेंजोच्या तालावर फेरी काढून वातावरण निर्मिती केली. भारत माता की जय,वंदे मातरमच्या घोषणा देत लोकांनी त्याला साथ दिली.शेवटी पांढऱ्या,हिरव्या आणि भगव्या रंगाचे फुगे हवेत सोडण्यात आले.हजारो नागरिक आणि शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.