महिला काँग्रेसच्या आंदोलनामुळे सरकारला जाग:प्रतिमा

0
900
 गोवाखबर:गोव्यात 10 रूपयांना मिळणारे नारळ 40 ते 45 रूपयांना विकुन सर्वसामान्य लोकांना लूटणाऱ्या नारळ माफियांचे रॅकेट उध्वस्त करून लोकांची सुटका करा,अशी मागणी महिला प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यश प्रतिमा कुतिन्हो यांनी कृषीमंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे केली आहे.
महिला काँग्रेस जर 5,10 आणि 15 रूपयांना नारळ विकु शकतात तर सरकार 20 रूपयांनी नारळ का विकणार आहे,असा प्रश्न करत नारळ 20 रूपयांपेक्षा स्वस्त दराने विका अशी मागणी कुतिन्हो यांनी केली. नारळ हा गोमंतकीयांच्या जीवनातील महत्वाचा भाग असल्याने सगळ्यांना नारळ मिळतील याची खबरदारी सरकारने घ्यावी असे आवाहन कुतिन्हो यांनी केले.
नारळाचे दर वाढत जाऊन देखील सरकार कुंभकर्णी झोपेत होते,महिला काँग्रेसच्या आंदोलनामुळे सरकारला जाग आली असा दावा कूतिन्हो यांनी केला.