महालेखा नियंत्रक म्हणून जे. पी. एस. चावला यांनी स्वीकारला पदभार

0
757

 

 

गोवा खबर:वित्त मंत्रालयात व्यय विभागात नवे महालेखा नियंत्रक म्हणून जे पी एस चावला यांनी आज पदभार स्वीकारला.

15 ऑक्टोबर 2019 पासून केंद्र सरकारने चावला यांची नवे महालेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे.

1985 च्या भारतीय नागरी लेखा सेवा अधिकाऱ्यांच्या तुकडीतल्या चावला यांनी दिल्लीतल्या दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगमधे बी ई पदवी प्राप्त केली आहे.

34 वर्षांच्या कारकीर्दीत प्रसार भारती, नागरी विकास, हवाई वाहतूक, पर्यटन, कृषी अशा विविध मंत्रालयात वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या केडरवर त्यांनी काम केले आहे.

महालेखा नियंत्रक म्हणून काम करण्यापूर्वी चावला यांनी मुख्य लेखा नियंत्रक, केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा शुल्क प्रमुख म्हणून काम केले आहे. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू करण्याआधी जीएसटी नेटवर्कची लेखा प्रक्रिया आणि कार्यान्वयनाला अंतिम रुप देण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.