आंध्रप्रदेश विधानपरिषदेच्या चित्तूर स्थानिक स्वराज संस्था मतदार संघातल्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम
गोवाखबर:महाराष्ट्र विधान परिषदेच्या, स्थानिक स्वराज संस्था मतदार संघात द्वैवार्षिक निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. आंध्रप्रदेश विधानपरिषदेच्या चित्तूर स्थानिक स्वराज संस्था मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात येणार असून, निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे आहे
येत्या 26 एप्रिलला या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 मे राहील, 4 मे रोजी अर्जांची छाननी होईल, 7 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, 21 मे रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ राहिल, 24 मे रोजी मतमोजणी होईल.
रायगड-सिंधुदुर्गचे अनिल तटकरे यांचा कार्यकाळ येत्या 31 मे रोजी समाप्त होईल तर नाशिकचे जयंत जाधव, वर्धा-चंद्रपूर, गडचिरोलीचे मितेश भांगडिया, परभणीचे अब्दुल्लाखान ए लतिफ खान दुर्रानी, अमरावतीचे प्रवीण पोटे आणि उस्मानाबाद, बीडचे दिलीप देशमुख या सदस्यांचा कार्यकाळ येत्या 21 जूनला समाप्त होणार आहे.
आंध्रपदेश विधानपरिषदेच्या चित्तुर स्थानिक स्वराज संस्था मतदार संघातल्या एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याने तिथे पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.