महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव-बजाजनगरच्या सरपंचाला रिव्हॉलव्हर बाळगल्या प्रकरणी गोव्यात अटक

0
923

गोवाखबर:महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील बजाजनगरचे सरपंच महेश भोंडवे यांना नगरच्या सरपंचा विरोधात रिव्हॉलव्हर बाळगल्या प्रकरणी कळंगुट पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
भोंडवे हे 32 बोअरचे नगरच्या सरपंचा विरोधात रिव्हॉलव्हर 7 जीवंत काडतूसांसह घेऊन कळंगुट मध्ये फिरत असताना आढळल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहिती नुसार,कळंगुट पोलिस क्षेत्र परिसरात हाणामारीची खबर कळंगुट पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिस घटनास्थळी पोचले असता संशयित भोंडगे यांच्याकडे रिव्हॉलव्हर असल्याचे आढळून आले.भोंडगे यांच्या MH-20-CU-0677 या कारमधून भोंडगे फिरत असल्याचे समजल्या नंतर डॉल्फिन सर्कल कडे पोलिसांनी त्यांना गाठून त्यांच्या कडून 32 बोअरचे रिव्हॉलव्हर आणि 7 जीवंत काडतूसे जप्त केली.
भोंडगे यांनी कळंगुट पोलिसां समोर रिव्हॉलव्हर परवाना सादर केला मात्र तो परवाना महाराष्ट्रासाठी असल्याचे आढळून आले.बेकयदेशीर पणे रिव्हॉलव्हर घेऊन गोव्यात फिरल्या प्रकरणी भोंडगे यांच्या विरोधात कळंगुट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोंडगे हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव-बजाजनगरचे सरपंच असल्याचे आढळून आले आहे.गोव्यात सध्या सागर कवच सुरक्षा अभियान सुरु असून त्या निमित्त असलेल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे भोंडगे यांना रिव्हॉलव्हर बाळगल्या प्रकरणी गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास करत आहेत.