महाराष्ट्राच्या सीमेवरील गावात दारूच्या विक्रीवर निर्बंध लागू

0
995

गोवा खबर:सरकारने आदेश दिला आहे की  या अधिकारक्षेत्रांमधील ‘मद्याची विक्री’ आणि ‘सार्वजनिक जागी मद्याचे सेवन’ यांच्यासाठीचे सर्व परवानाधारक परिसर डिचोली तालुका – ग्रामपंचायत लाटंबार्से – वॉर्ड दोडामार्ग-१, खरपाल-२, ग्रामपंचायत साळ – वॉर्ड खोलपें-७, खोर्गिरे-६, पेडणे तालुका – ग्रा.पं. केरी – वार्ड तेरेखोल-१, ग्रा.प. तोरसे वॉर्ड पत्रादेवी-१, ग्रा.प. इब्रामपूर- वॉर्ड- हणखणे १ आणि २ आणि हडस-३, ग्रा.प. पालये – वॉर्ड किर्णपाणी-४,

सत्तरी तालुका, ग्रा.प. केरी वॉर्ड शिरोली-३ आणि रावण कॉलनी-२, ग्रा.प. पर्ये – वॉर्ड राणेवाडो-१ आणि गुरववाडो-१, ग्रा.प. मावळिंगे (उत्तर) वॉर्ड मावळिंगे-३ आणि ग्रा.प. कुडचिरे वॉर्ड कुडचिरे-६ हे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ आणि मतमोजणीसाठी अनुक्रमे ऑक्टोबर १९, २०१९ रोजी संध्याकाळी ०६.०० पासून ते ऑक्टोबर २१, २०१९ च्या मध्यरात्रीपर्यंत आणि ऑक्टोबर २४, २०१९ रोजी ००.०० पासून मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील.

परंतु, ‘बार अँड रेस्तराँ’चे परवाने असलेल्या परवानाधारकांना जेवणासाठी खुले राहण्याची परवानगी दिली जाईल आणि बार काउंटर बंद राहील आणि उल्लेख केलेल्या दिवशी मद्य पुरवण्यास मनाई राहील. ‘बार अँड रेस्तराँ’ असलेल्या परवानाधारक मालकांनी परिसरात, मद्य पुरवले जाणार नाही आणि रेस्तराँ केवळ जेवणासाठी खुले राहील, अशा आशयाचा एक फलक लावावा.