महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आज गोव्यात 3 प्रचार सभा

0
761
गोवा खबर:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आज एका दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत.फडणवीस यांच्या 3 प्रचार सभा आज दिवस भरात आयोजित करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली सभा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील साखळी येथे सायंकाळी 4 वाजता होणार आहे.दूसरी सभा दक्षिण गोवा मतदारसंघासाठी सावर्डे येथे सायंकाळी 6 वाजता आणि शेवटची सभा वास्को येथे रात्री 8 वाजता होणार आहे.
पहिल्या नियोजना नुसार फडणवीस यांचा प्रचार दौरा 20 एप्रिल रोजी ठरला होता.आता त्यात बदल करून तो आज 18 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.
फडणवीस यांच्या सोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर,आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, विज मंत्री नीलेश काब्राल, पंचायत मंत्री माविन गुदींन्हो यांच्यासह उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्याचे उमेदवार नरेंद्र सावईकर उपस्थित राहणार आहेत.
भाजपने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात स्टार प्रचारकांना मैदानात उतरवले आहे.केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, नितिन गडकरी यांच्या नंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गोव्यातील भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत असून त्याला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.