महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 रोजी गोव्यात

0
644
गोवा खबर:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 एप्रिल रोजी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी एका दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत.
20 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांचे दाबोळी विमानतळावर आगमन होणार आहे.त्यानंतर सायंकाळी 4 वाजता उत्तर गोव्यातील साखळी येथे त्यांची पहिली जाहीर प्रचार सभा होणार आहे.
सायंकाळी 6 वाजता दक्षिण गोव्यात मडगाव येथील लोहिया मैदानावर त्यांची दूसरी जाहीर प्रचार सभा होणार आहे.
रात्री 8 वाजता वास्को मार्केट जवळ फडणवीस यांची शेवटची जाहीर प्रचार सभा होणार आहे.त्यानंतर रात्री 10 वाजता दाबोळी विमानतळा वरुन ते मुंबईस परतणार आहेत.