महानंद पॅरोल रदद् प्रकरणी शिवसेनेकडून तुरुंन महानिरीक्षकांचे आभार

0
1726
तुरूंग महानिरीक्षक राजेंद्र मिरजकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार प्रगट करताना शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ श्रेहा धारगळकर व संपर्क प्रमुख रीया पाटिल.
गोवाखबर:कुख्यात सिरीयल किलर महानंद नाईक याला २१ दिवसांसाठी पॅरोलवर बाहेर सोडण्याचा निर्णय तक्रारदार महिलांसाठी धोक्याचा असून पॅरोल मंजुरीस गोवा राज्य शिवसेने महिला आघाडी प्रमुख श्रेहा धारगळकर यांच्या नेतृत्वाखाली विरोध केला होता. तशा आशयाचे निवेदन तुरूंग महानिरीक्षक  राजेंद्र मिरजकर यांना देण्यात आले होते. शिवसेना महिला आघाडीची मागणी मान्य करून महादेव नाईक याचा पॅरोल रद्द केल्याबद्दल धारगळकर यांनी तुरूंग महानिरीक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
 त्यावेळी त्यांच्याबरोबर महिला आघाडी संपर्क प्रमुख रीया पाटील आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.