महात्मा गांधीच्या खुन्यांच्या भक्ताना काॅंग्रेसला श्रीराम शिकवीण्याचा अधिकार नाही : सुभाष फळदेसाई

0
473
गोवा खबर: आपल्या जीवनाच्या अखेरच्या श्वासा पर्यंत ह्रदयात राम जपणाऱ्या महात्मा गांधीजींचे विचार पुढे नेणारा काॅंग्रेस  हा एकमेव पक्ष आहे. सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या  खुन्यांची भक्ती करणाऱ्या भाजपवाल्यांना काॅंग्रेसला श्रीराम शिकवीण्याचा नैतीक अधिकार नाही असा पलटवार  काॅंग्रेसचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई यांनी केला आहे. 

काॅंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी  कोरोना फैलावासाठी चतुर्थी उत्सवात सहभागी झालेल्या  गणेश भक्तांना जबाबदार धरण्याचा मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध केला ते योग्यच आहे. मुख्यमंत्र्यानी  गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या बद्दल माफी मागावीच लागेल,असे फळदेसाई म्हणाले.
गोव्यात कोरोनाचा फैलाव केवळ भाजपच्या नाकर्तेपणामुळेच झाला हे मुख्यमंत्र्यांचा बचाव करण्यासाठी पुढे आलेल्या भाजप प्रवक्ते दत्तप्रसाद नाईकांनी ध्यानात ठेवावे असा टोला  फळदेसाई यांनी हाणला आहे.
फळदेसाई म्हणाले,काॅंग्रेस पक्षाने राजकारणात धर्माचा वापर कधीच  केला नाही. प्रत्येकाला आपल्या भावनेनुसार हव्या त्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार व स्वातंत्र्य असल्याचे काॅंग्रेसचे धोरण आहे. त्यामुळे केवळ राजकीय फायदा उठविण्यासाठी निवडणुकांवेळी धार्मीक भावना चिथावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला इतर वेळी लोकांच्या भक्तीचा व भावनेचा विसर पडतो व त्यामुळेच मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंतांसारखे भाजपवाले बेजबाबदार वक्तव्ये करुन सच्चा देव भक्तांचा अपमान करतात.
काॅंग्रेसला उपदेश देणाऱ्या भाजपवाल्यांनी  दसरा उत्सवात पायात सॅंडल घालुन श्रीराम, श्रीलक्ष्मण व श्री हनुमानाची आरती करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना संस्कृतीचे पाठ शिकण्यास सांगावे. अयोध्येत श्रीराम मंदिर शिलान्यास सोहळ्यात पवित्र रोपटे लावताना मोदींच्या पायांत वहाणा होत्या हे सर्वानी बघितले आहे. गोव्यात श्री जगन्नाथाच्या  रथा समोर विधी करताना पायात चप्पल घालणारे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर या सारख्या नेत्यांचे बेगडी धर्म प्रेम जनतेने बघितले आहे,याची आठवण फळदेसाई यांनी करून दिली.
प्रत्येक काॅंग्रेस कार्यकर्त्याला हव्या त्या धर्माचे, परंपरेचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. देशाची घटना हाच काॅंग्रेसचा पवित्र ग्रंथ आहे व संसद व विधानसभा हीच आमची मंदिरे आहेत असे  फळदेसाई म्हणाले.
कोविडचे संकट गोव्यात महाभयंकर होत असुन, सरकारने ताबडतोब कृती न केल्यास काॅंग्रेस पक्षाला लोकांना घेवुन रस्त्यावर येण्यास भाग पडेल असा इशारा फळदेसाई यांनी दिला आहे.