मला टेलिव्हिजन हे माध्यम खूप आवडतं: जुई गडकरी 

0
1647

      अभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या निरागसतेने आणि तिच्या अभिनय कौशल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे. जुईच्या लोकप्रियतेमुळे तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. लवकरच जुई झी युवावरील वर्तुळ या मालिकेतूनप्रेक्षकांच्या भेटीस येणार  आहे. या मालिकेत ती मीनाक्षी नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. १९ नोव्हेंबर पासून ही मालिका प्रसारित होणार असून या मालिकेविषयी आणि तिच्या व्यक्तिरेखेबद्दल तिच्याशी साधलेला ही खास संवाद

१.बऱ्याच काळानंतर तू मालिकेत प्रमुख भूमिकेत पदार्पण करतेयपुनरागमनासाठी वर्तुळ हि मालिका का निवडावीशी वाटली?

 मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही कि हे माझं पुनरागम आहे. वर्तुळ मालिकेचं कथानक खूपच रंजक आहे आणि म्हणून हि मालिका करण्यासाठी मी लगेचचहोकार दिला. मला टेलिव्हिजन हे माध्यम खूप आवडतं कारण या माध्यमाचा पसारा खूप मोठा आहे आणि तसेच या माध्यमामुळे मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्यांना भेटू शकते.

२. वर्तुळाची कथा वेगळी आहे, त्यातील मीनाक्षीची व्यक्तिरेखा का निवडावीशी वाटली?

– मी नेहमीच माझ्यापेक्षा वेगळ्या असलेल्या व्यक्तिरेखा साकारायला आवडतात आणि मीनाक्षीची व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी मानसिक आणि शारीरिक पातळीवर आव्हानात्मक आहे कारण या व्यक्तिरेखेच्या विविध छटाआहेत. अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणं ही माझ्यासाठी एक सुवर्णसंधी आहे, म्हणूनच मी ही व्यक्तिरेखा स्वीकारली आणि ती निभावण्याचा मी पुरेपूर प्रयत्न कारेन.

३. तू मीनाक्षीशी खऱ्या आयुष्यात किती रिलेट करू शकते?

–  मीनाक्षीचे काही पैलू हे आपल्या सर्वांमध्ये असतील असं मला वाटतं. सगळ्यांमध्ये सहनशीलता, संयम आणि करुणा असते. मीनाक्षी ही एक स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी आहे जी मी खऱ्या आयुष्यात आहे. त्यामुळे मीमीनाक्षीच्या काही पैलूंशी मी रिलेट करू शकते.

४. मालिकेचे प्रोमोज पाहून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे, आम्हाला मालिकेबद्दल थोडक्यात काय सांगशील?

– या मालिकेचं कथानक टिपिकल सासू सून भांडण आणि फॅमिली ड्रामा असलेलं नाही आहे. ही मालिका रहस्यमय आहे. या मालिकेत थोडा ड्रामा तसंच वास्तविकता देखील आहे. आपण नेहमी म्हणतो कि आपण आयुष्यात पुढेजात असताना भूतकाळ मागे ठेवतो पण खरं तर हे आहे कि भूतकाळ आपल्याला कधीच सोडत नाही आणि वर्तुळ ही मालिका वर्तमानकाळात डोकावणाऱ्या भूतकाळाची आहे.

५. मालिकेचे प्रोमोज रिलीज झाल्यानंतर तुला तुझ्या चाहत्यांकडून किंवा इंडस्ट्रीतील तुझ्या मित्र-मैत्रिणींकडून काय प्रतिक्रिया आल्या?

हो, प्रोमोज आऊट झाल्यावर माझा इनबॉक्स मेसेजेसने भरलेला होता. माझे चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. मला बऱ्याच जणांनी असं विचारलं कि हा हॉरर शो आहे का?त्यामुळे मला सगळ्यांना हे सांगायचंय कि ही एक रहस्यमय कथा आहे.