मर्सिडिझ-बेंझने उद्घाटन केले गोव्यातील सर्वांत मोठ्या थ्रीएस लक्‍झरी कार डीलरशिपचे

0
1084

गोवा: भारतातील लक्‍झरी कार्सचे सर्वांत मोठे उत्पादक मर्सिडिझ-बेंझने गोव्यात थ्रीएस लक्‍झरी कार
डीलरशिपचे उद्‌घाटन केले. पणजी शहराच्या हद्दीत रिबांदेर नावाच्या सुंदर गावात अत्यंत मोक्याच्या
ठिकाणी असलेल्या या दर्जेदार लक्‍झरी डीलरशिपची स्थापना कौण्टो मोटर्सने केली आहे. हे नवीन केंद्र
गोवा आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये सेवा देईल. या लक्‍झरी थ्रीएस डीलरशिपचे उद्‌घाटन मर्सिडिझ-बेंझचे
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रोलाण्ड फोल्गर आणि कौण्टो मोटर्सचे
व्यवस्थापकीय संचालक श्री. आकाश खौंटे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मर्सिडिझ-बेंझचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक रोलाण्ड फोल्गर म्हणाले,
“आमच्या देशभर पसरलेल्या समजुतदार ग्राहकांच्या जवळ पोहोचण्याचे मार्ग आम्ही, मर्सिडिझ-बेंझ
इंडिया, सातत्याने तयार करत असतो. बाजारपेठेतील आमची सर्वोत्कृष्ट उत्पादने आणि सेवा ग्राहकांना
देऊन त्यांचा आमच्या ब्रॅण्डची गाडी चालवण्याचा अनुभव उत्तम व्हावा याची काळजी आम्ही घेतो. कौण्टो
मोटर्ससारखी अत्याधुनिक सुविधाकेंद्रे आम्हाला 'ग्राहकांकडे जा' या काळजीपूर्वक आखलेल्या धोरणाची
अंमलबजावणी करण्यात मदत करतात. या धोरणामुळे आम्हाला बाजारपेठेतील स्पर्धेत पुढे राहता
येते. बाजारपेठेच्या सखोल अनुभवाच्या जोरावर ग्राहकांना सर्वोच्च दर्जाची सेवा देणारे कौण्टो मोटर्ससारखे
भागीदार आहेत याचा आम्हाला आनंद आहे. ही नवीन लक्‍झरी डीलरशिप सुरू करून आम्ही गोवा आणि
आसपासच्या ग्राहकांना आधुनिक आरामदायी वाहन पुरवण्याचा आमचा वायदा अधिक दृढ करत आहोत.”
या नवीन केंद्राच्या स्थापत्यशैलीच्या संकल्पना आमच्या कार्यात्मक गरजांशी सुसंगत आहेत; तसेच या
केंद्रांमध्ये जिव्हाळ्याचे वातावरण ठेवण्याच्या आमच्या कल्पनेशी सुसंगत आहेत.मर्सिडिझ-बेंझ

सीआय/सीडीप्रमाणेच या केंद्रावरही कोनात्मक रचनेच्या संकल्पना वापरण्यात आल्या असून त्या मर्सिडिझ-
बेंझच्या चैतन्यपूर्ण आकृतीशी मिळत्याजुळत्या आहेत. सौंदर्यपूर्ण आणि दृष्य स्वरुपातील आकर्षण निर्माण
करण्यासाठी कोनात्मक रचना वापरण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या संवेदना जागृत करून त्यांना एक
स्मरणीय अनुभव मिळावा म्हणून संपूर्ण रचनेत आयत सोडून अन्य आकार ठळकपणे वापरण्यात आले
आहेत.
अत्याधुनिक थ्रीएस सेवाकेंद्र हे रिबांदर येथे अत्यंत सोयीच्या ठिकाणी आहे. राजधानी पणजी आणि जुन्या
गोव्याच्या मध्‍ये असलेल्या इल्हाश जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४-अजवळ हे केंद्र आहे. कारखाना
एकूण २५,००० चौरस फूट जागेत पसरलेला असून, यामध्ये २८ प्रशिक्षित कर्मचारी आहेत. हे कर्मचारी
दिवसाला सुमारे १५ गाड्यांची दुरुस्ती व सर्व्हिसिंग करू शकतात. वर्कशॉपमध्ये एकात्मिक बॉडी शॉपही
आहे. कौण्टो मोटर्सने येथे नऊ गाड्या डिसप्लेसाठी, तर देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी १४ बेज तयार केले
आहेत. हे नवीन जागतिक दर्जाचे थ्रीएस सुविधाकेंद्र मर्सिडिझ-बेंझ या ब्रॅण्डखालील सर्व प्रकारच्या
उत्पादनांची विक्री करून त्यासाठी सेवा पुरवेल.
याशिवाय हे केंद्र गाड्या मोफत आणण्याची व पुन्हा पोहोचवण्याची सुविधा संपूर्ण गोव्यामध्ये पुरवणार
आहे. चालक व ग्राहकांसाठी स्वतंत्र लाऊंज टीव्ही व वायफायच्या सुविधासह आहेत. वेगवान सेवा आणि
मर्सिडिझ-बेंझचे सर्व अधिकृत भाग व अॅक्सेसरीज येथे वैविध्यासह उपलब्ध आहेत. कौण्टो मोटर्सचा पत्ता
पुढीलप्रमाणे: अल्कन हाउस, चालता क्रमांक: ७२, पी.टी. शीट क्रमांक_१९, राष्ट्रीय महामार्ग चार-
अ, रिबांदर, गोवा- ४०३००६
कौण्टो मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक  आकाश खौंटे म्हणाले, “जगातील व देशातील अग्रगण्य
लक्‍झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडिझ-बेंझसोबत आमचे सात वर्षे जुने संबंध आणखी गहिरे झाल्याचा
आम्हाला आनंद आहे. अलीकडच्या काळात गोव्याला लक्‍झरी कारच्या बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान प्राप्त
झाले आहे. यामुळे आम्हाला आमचे ग्राहक आणि ब्रॅण्डप्रेमींना एक सर्व काही एका छताखाली देणारे थ्रीएस
लक्‍झरी कार सेवाकेंद्र गोव्यात सुरू करण्याची संधी मिळाली आहे. कौण्टो मोटर्सची रचना
धोरणात्मकरित्या निसर्गरम्य रिबांदर शहरात गावात करण्यात आली आहे. यामुळे हे केंद्र केवळ गोव्यालाच
नव्हे, तर लगतच्या जिल्ह्यांनाही सेवा पुरवू शकेल. सोयीस्कर जागा आणि ५३ प्रशिक्षित कर्मचारी यांना
आधुनिक आरामाच्या संकल्पना व स्थापत्यकलेची जोड मिळाली असल्याने आमच्या ग्राहकांना आम्ही
जागतिक दर्जाचा मर्सिडिझ-बेंझ ब्रॅण्ड अनुभव देऊ शकू अशी खात्री वाटते.”
मर्सिडिझ-बेंझचे देशातील जाळे अत्यंत घट्ट असून ४२ शहरांत त्यांची ८६ केंद्रे आहेत. हे जाळे आणखी
विस्तारण्याच्या धोरणामुळे ब्रॅण्ड प्रत्येक संभाव्य ग्राहकापर्यंत नेता येतो तसेच जुन्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट
सेवा पुरवून ब्रॅण्डचा उत्तम अनुभव देता येतो.

SHARE
Previous article
Next article