मम्माज कॉर्नर पाटो प्लाझामध्ये आता ऑल डे डायनिंग

0
1157
गोवा खबर: साईप्रकाश रायकर आणि भावना रायकर यांच्या पाटो प्लाझा येथील मम्माज कॉर्नर या नव्या डायनिंग रुमचे आज उदघाटन झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते झाले. यावेळी मम्माज कार्नरचे मालक साईप्रकाश रायकर आणि भावना रायकर व इतर निमंत्रित उपस्थित होते.

२०१६ पासून साईप्रकाश रायकर आणि भावना रायकर यांनी मम्माज कार्नर हा हॉटेल व्यवसायातील एक ब्रँड तयार केला आहे. पर्वरीत मॉल दी गोवा आल्यावर त्यांनी तिथे मम्माज कॉर्नर (नॉर्थन स्पाईस) आणि मम्माज कॉर्नर (मिड ईस्ट स्पाईस) या दोन फूड कॉर्नर्सने खवय्या ग्राहकांना सेवा सुरू केली. ग्राहकांकडून तिथे मिळणारा प्रतिसाद आणि पाटो प्लाझा या व्यावसायिक भागात चांगल्या भोजनसेवेची असलेली गरज ओळखून त्यांनी आपले पंख पसरले. गेरा इम्पेरियम ग्रँड या प्रसिद्ध कमर्शियल इमारतीत त्यांनी मम्माज कॉर्नर (ऑल डे डायनिंग) ही नवीन डायनिंग रुम चालू केली आहे.
पाटो प्लाझा येथील गेरा इम्पेरियम ग्रॅंड येथे शुभारंभ झालेल्या मम्माज काॅर्नर या आॅल डे डायनिंग रुमचे उदघाटन करताना मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत. बाजूला मालक साईप्रकाश रायकर व भावना रायकर आणि इतर निमंत्रित.
पाटो प्लाझा या गजबजलेल्या व्यावसायिक ठिकाणी ग्राहकांना हवा तो प्रशस्तपणा,  तत्परता आणि स्वच्छता व काहीसे आलिशान तरीही वाजवी दरातील खमंग, खुसखुशीत व रुचकर भोजन ही ग्राहकांची गरज ओळखून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. १४ टेबल्स आणि ६० ग्राहकांना एकाच वेळी सेवा देण्याची सोय यामुळे मम्माज कॉर्नरवर ग्राहकांच्या उड्या पडणार हे निश्‍चितच आहे. खुसखुशीत इडली सांबार, उत्तप्पा व डोश्‍यांचे विविध प्रकारांसह साऊथ इंडियन ब्रेकफास्ट, दुपारच्या भोजनासाठी विविध माशांच्या प्रकारांनी नटलेली गोमंतकिय फिश करी राईस थाळी, रुचकर व पौष्टिक शाकाहारी थाळी इथले कुशल कुक्स बनवणार आहेत.
इतकेच नव्हे तर मम्माज कॉर्नरचे नागार्जुन, बंगलोरमधील रेस्टॉरंट्समध्ये अनुभवाने समृद्ध झालेले हैद्राबादी शेफ आंध्रा स्पशल स्टाईलमधील बियार्णीचे विविध प्रकार मम्माज कॉर्नरच्या ग्राहक खवय्यांना खिलवून खुश करणार आहेत. शांत, प्रशस्त ॲम्बियन्स आणि जोडीला तत्पर सेवेसह रुचकर व स्वादिष्ट भोजन यामुळे कामाच्या तणावाने दमलेला ग्राहकराजा मम्माज कॉर्नरमध्ये जणू ” आईच्या हातचे सुग्रास भोेजन ” करून पुन्हा ताजातवाना होणार, हे निश्‍चित आहे. उद्घाटक डॉ. प्रमोद सावंत यांनी येथील एकूण व्यवस्था व मेनू कार्ड पाहून गतीमान होत चाललेल्या पाटो प्लाझामधील व्यावसायिक गोव्याला अशाच डायनिंग रुमची गरज होती व ती तुम्ही पूर्ण करीत आहात, याबद्दल रायकरांचे विशेष अभिनंदन केले.
मम्माज कॉर्नरमधील पदार्थांचे दर हे मार्केट फ्रेंडली म्हणजे अत्यंत वाजवी आहेत. पाटो प्लाझामधील कंपन्यांना आपल्या ग्राहकांना समाधान देण्यासाठी इथे ब्रेकफास्ट वा भोजनासाठी आणणे, ही व्यवसायातील अतिरिक्त सेवा होईल, असा कौतुकाचा स्वर एका निमंत्रिताने यावेळी व्यक्त केला. आरामदायी, निवांत व शांत वातावरण आणि तत्पर सेवा व रुचकर भोजन ही आपल्या यशाची पंचसूत्रे आहेत व ती आम्ही जपत आहोत, असे यावेळी बोलताना साईप्रकाश रायकर आणि भावना रायकर यांनी विनम्रपणे सांगितले.