मनोहर पर्रीकरांवरील पुस्तकाचेरविवारी पणजीत प्रकाशन

0
980

गोवा खबर:गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची एकूण दैदीप्यमान राजकीय वाटचाल आणि त्यांचे जीवन केंद्रस्थानी ठेवून गोव्याच्या तीस वर्षांच्या राजकीय कालखंडावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, 19 मे  रोजी पणजीत होत आहे.

मनोहर पर्रीकर यांची आमदार, विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री म्हणून कारकिर्द ज्यांनी पाहिली, अनुभवली ते पत्रकार सदगुरू पाटील यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन सहित प्रकाशनने केले आहे. पर्रीकर यांच्यावरील हे एकूणच पहिलेच पुस्तक आहे.
पर्रीकर यांचे चांगले योगदान सांगतानाच व त्यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकतानाच   राज्याचे 30 वर्षांचे राजकारण रंजक पद्धतीने मांडण्यात आले आहे.
कला अकादमीत रविवारी सायंकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल. यावेळी देशाचे अतिरिक्त साॅलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी हे खास अतिथी म्हणून उपस्थित असतील. तर साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक विश्राम गुप्ते प्रमुख वक्ते या नात्याने पुस्तकावर बोलतील, असे सहित प्रकाशनाच्यावतीने किशोर अर्जुन यांनी सांगितले.