मधुमेहासंबंधी जागृती करण्यास सामंजस्य करार

0
949

गोवा खबर:गोव्यातील लोकांमध्ये मधुमेहाशी संबंधित समस्या वाढण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. या समस्येच्या निवारणासाठी त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे, जेणेकरून राज्याला भविष्यात धोका संभवू नये, असे मत महिला आणि बाल विकास आणि आरोग्यमंत्री  विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले.

दर्जात्मक आयुष्यासाठी मधुमेह व त्याच्या व्यवस्थापनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आरोगय सेवा संचालनालय आणि सनोफी इंडिया लिमिटेड यांच्यामध्ये करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर ७०% पेक्षाही अधिक मृत्युंसाठी कारणीभूत असलेल्या जीवनशैलीविषयक रोगांविरोधात लढा देण्यासाठी सनोफी सोबत आमची भागीदारी लाभदायक ठरेल.

या कराराद्वारे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विभागासाठी काम करणार्‍या राज्याच्या खात्यातील आरोग्य कर्मचार्‍यांना आणि आरोग्य व वेलनॅस केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना सनोफी इंडियाच्या वैद्यकीय तज्ज्ञ व डायबेटोलॉजिस्टच्या समुहातर्फे शिक्षण देण्यात येईल. याद्वारे (किड्स एन्ड डायबेटिस इन स्कूल) या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे शालेय मुलांमध्ये मधुमेहाविषयी जागृती करण्यासाठी मदत होईल.

 क्लिनीक आणि दवाखाने तसेच वर्ग आणि घरातसुध्दा मधुमेहाचे संबोधन केले पाहिजे असे, सानोफी इंडीया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक  एन्. राजाराम यांनी सांगितले. राज्य आणि नीति रचनाकारांकडे गैर संसर्गजन्य रोगांविरोधात लढण्यासाठी त्यांच्या प्रगतीशील प्रयत्नात आम्ही काम करण्यास वचनबध्द आहोत. मधुमेह रोगांविरोधात लढण्यासाठी गेल्या तीन वर्षाची सीएसआरची भागीदारी मजबूत ठरेल.

ही भागीदारी दोन दृष्टीकोनांचे अनुसरण करेल. पहिला, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विभागातील कर्मचारी आणि आयुष्यमान भारतचा भाग म्हणून आरोग्य आणि कल्याण केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांसाठी मधुमेह व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. दुसरा, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमधील शिक्षण आणि प्रतिबध्दता राज्यातील एकूणच मधुमेह रोगासंबंधीचे ओझे कमी करण्यात येईल.