मत्स्य शेतीत स्नयंपूर्ण बनण्याचा संकल्प करूया: रॉड्रीगीज

0
421

गोवा खबर:स्नयंपूर्ण बनणे ही काळाची गरज असल्याचे सांगून मत्स्योध्योगमंत्री श्री फिलीप नेरी रॉड्रीगीज यांनी लोकाना मत्स्य शेती हा व्यवसाय म्हणून हाती घेण्याचा सल्ला दिला आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेस हातभार लावून स्वताची प्रगती साधण्याचे सांगितले. उद्योजक बनण्यास मासे पालन हा एक उत्तम व्यवसाय आहे आणि यासाठी मत्स्योध्योग खात्यातर्फे अनेक योजना असून त्याद्वारे लोकाना अनुदानही देण्यात येते. या व्यवसायात उतरण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात त्यासाठी संयम महत्वाचा आहे. हा व्यवसाय म्हणजे सततच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे असे रॉड्रीगीज यांनी सांगितले. पाटो पणजीतील संस्कृती भवनात आयोजित केलेल्या जागतिक  मत्स्योध्योग दिन समारंभात ते बोलत होते.

यावेळी मंत्र्यांहस्ते सदर खात्याच्या http://fisheries.goa.gov.in या वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी  मत्स्योध्योग खात्याचे सचिव श्री पी एस रेड्डी, भारतीय संशोधन मंडळाचे संचालक ई डी चाकोरकर आणि मत्स्योध्योग संचालिका डॉ. शमिला मोंतेरो उपस्थित होत्या.

पुढे बोलताना मत्स्योध्योगमंत्री श्री फिलीप नेरी रॉड्रीगीज यांनी मत्स्योध्योग खाते पूर्वीपेक्षा अधिक गतीने काम करणार असल्याचे अश्वासन दिले आणि दिलेल्या वेळेत स्वीकारलेले अर्ज निकालात काढतील असे ते म्हणाले. मत्स्य शेतकऱ्यानी प्रामाणिकपणे व्यवसाय करून दर्जात्मक माशे उपलब्ध करून वाजवी दरात विक्री करण्याचे सांगितले. सदर खात्याने आणि मच्छिमार समाजाने हातात हात घालून काम केले पाहिजे असे ते म्हणाले.  मत्स्य उत्पादनात भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश असल्याचे सांगितले आणि म्हणून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री  मत्स्य संपदा योजना सुरू केल्याचे सांगितले. यश संपादन करण्यासाठी गोव्यातील शेतकऱ्यानी हा मच्छिमारीचा नवीन व्यवसाय अवश्य सुरू करावा असे ते म्हणाले. प्रधानमंत्री  मत्स्य संपदा योजनेखाली सुमारे १८ लाभधारकांना मंजुरी पत्रे वितरीत करण्यात आली. सात जणांना किसान क्रेडिट कार्डे आणि मासे विक्री ओळख पत्रे देण्यात आली.  पावर पॉंइंट प्रेजेंटेशनही सादर करण्यात आले.

यावेळी लाभधारकाना मच्छिमारी मोटर बाईक आणि मच्छिमारी वाहन प्रदान करण्यात आले.

सुरवातीस डॉ. शमिला मोंतेरो यानी उपस्थितांचे स्वागत केले. श्री चाकोरकर यांचेही यावेळी भाषण झाले. श्री सचिन सुर्लीकर यानी सूत्रसंचालन केले व आभार मानले.