मतदारांचा विश्वास असल्याने 20 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होणार: सोपटे यांचा दावा

0
623
गोवा खबर: मांद्रे मतदार संघातील जनतेचा आपल्यावर विश्वास आहे.त्यामुळे  20 वीस हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्य घेऊन विजयी होणार, असा विश्वास माजी आमदार आणि भाजपाचे उमेदवार दयानंद सोपटे यांनी  पार्से येथील प्रचारा दरम्यान पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतीत  दयानंद सोपटे यांनी 14 रोजी पार्से चोनसाई परिसरात घरोघरी प्रचार केला.मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद हुरूप वाढवणारा असल्याचे सोपटे म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत पार्से सरपंच प्रगती सोपटे संगीता सातर्डेकर व शेकडो समर्थक होते.
 सोपटे म्हणाले, पहिल्या टप्प्यात पूर्ण मतदार संघाचा घरोघरी दौरा केला आहे. आपल्याला जो मिळत असलेला प्रतिसाद हा आपल्या विजयाचा मार्ग सुकुर करणार आहे. गेल्या निवडणुकीत साडेसात हजार मतांची आघाडी घेतली होती या पोट निवडणुकीत डब्बल आघाडी घेवून वीस हजार मतांनी विजयी होणार आहे.
 विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते सध्या वैयक्तिक पातळीवर जावून प्रचार करीत असल्याचा आरोप करून सोपटे म्हणाले, विरोधकांच्या  भूलथापाना मांद्रे मधील जनता बळी पडणार नाही.आपण मागच्या वीस वर्षापासून राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करीत आहे. आपल्यासोबत जनता आहे त्यामुळे आपला विजय हा ज्यादिवशी आपण उमेदवारी अर्ज भरला त्याच दिवशी ठरलेला आहे.
मांद्रे मतदार संघातून आपल्या विरोधकांची ताकत काय आहे हे मतादानावेळी दिसून येणार असा दावा करून आपणास या मतदार संघात कुणीही विरोधक नसून एकतर्फी निवडणुकीत आपण विजयी  होवू असा विश्वास सोपटे यांनी व्यक्त केला.
मांद्रे मतदार संघाचा सर्वांगीण विकास हेच या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा आहे , बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळणार असल्याचे सांगून लोकांच्या मतानुसार आपण भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असे सोपटे यांनी यावेळी सांगितले.