मतदान केंद्र आणि निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मतदार यादीचा मसुदा उपलब्ध

0
243

 

 

केंद्रिय निवडणुक आयोगाच्या कार्यक्रमानुसार गोवा राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघा संबंधित मतदार यादीचा एकत्रित मसुदा १६ नोव्हेंबर २०२० रोजी सर्व मतदान केंद्रे आणि निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कचेरीत प्रदर्शित करण्यात आला आहे 

  जानेवारी २०२१ ही पात्र तारीख ठरवून गोवा राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघा संबंधित मतदार यादीची विशेष उजळणी मोहिम चालू केली आहे जानेवारी २०२० ही पात्र तारीख ठरवून   फेब्रुवारी २०२० रोजी प्रसिध्द केलेल्या अंतिम मतदार यादीप्रमाणे ११,३५,४१४ मतदार होते आणि आता १६ नोव्हेंबर २०२० रोजी प्रसिध्द केलेल्या मसुदा यादीप्रमाणे ११,३६,५९१ मतदार आहेत.

त्याचप्रमाणे उत्तर गोव्यात एक आणि दक्षिण गोव्यात पांच मिळून एकूण सहा नवी केंद्रे तयार केली आहेत. दक्षिण गोव्यातील एक मतदान केंद्र वगळण्यात आले आहे. राज्यात एकूण  १६६३  मतदान केंद्रे आहेत.