मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी गोव्यात दारू विक्रीस बंदी

0
723
 गोवा खबर:लोकसभा निवडणूक आणि विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर  २१ एप्रिलच्या संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते २३ एप्रिल पर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी  २३ मे रोजी गोवा राज्यातील सगळी दारू विकण्याची आस्थापन बंद असणार.
तसेच बेळगांव सिमेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुर्ला आणि कारवार सिमेवरून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या काणकोण तालुक्यातील पोळे आणि लोलये परिसरातील सगळी दारू विकणारी आस्थापने दि. १६ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते १८ एप्रिल २०१९ रोजी सं ६ वाजेपर्यंत आणि दि. २१ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते २३ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी २३ मे २०१९ रोजी बंद असणार.
बार आणि रेस्टॉरंट परवाना असलेल्या आस्थापनाला केवळ अन्न जिन्नस विकण्यास मिळणार. अशा आस्थापनांनी दरू विकण्यास उपलब्ध नाही असा बोर्ड लावावा लागेल.