मणिपाल हॉस्पिटल्स गोवामध्ये ४८ वर्षीय महिलेवर गोव्यातील पहिली गोल्ड नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी

0
1246

नावीन्यपूर्ण तंत्र आणि कमी झीज असलेला सांधेजोडामुळे कोणतीही प्रतिकूल प्रतिक्रिया टाळली जाते; या प्रसंगी हॉस्पिटलमध्ये ‘नी पेन क्लिनिक’चा शुभारंभ

गोवाखबर: महिला रुग्णास ‘नी ऑफ गोल्ड’ बहाल करत मणिपाल हॉस्पिटल्स गोवा हे राज्यातील नी गोल्ड शस्त्रक्रिया यशस्वी करणारे पहिले हॉस्पिटल बनले आहे. ही अनोखी ‘गोल्ड नी प्रत्यारोपण’ शस्त्रक्रिया मणिपाल हॉस्पिटल-गोवामधील सांधेजोड प्रत्यारोपण सल्लागार शल्यविशारद डॉ. रोहन देसाई यांनी केली. गुडघ्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य आरोग्यसुविधा देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ‘नी पेन क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. दर बुधवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे क्लिनिक रुग्णसेवेसाठी खुले असेल.

गोल्ड नी प्रत्यारोपण हे नवे, आधुनिक तंत्रज्ञान आहे. पारंपरिक टिटॅनिअम नायट्राइड किंवा झिर्कोनिअम नायट्राइडसह कोबाल्ट-क्रोमिअम तंत्रज्ञानाची जागा आता या नव्या तंत्रज्ञानाने घेतली असून विविध प्रकारच्या धातूंबाबत अलर्जी असलेल्या रुग्णांसाठी दीर्घकालीन लाभ मिळण्यासाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. टिटॅनिअममुळे सोनेरी रंग मिळतो आणि या धातू कणांबाबत खूपच कमी अलर्जी होण्याची शक्यता असते. २०११ पासून अमेरिकेमध्ये या शस्त्रक्रिया पद्धतीचा अवलंब केला जात असून युरोपातही या तंत्राचा अवलंब वाढत आहे. २०१६मध्ये या तंत्राने भारतात प्रवेश केला. गोल्ड नी इम्प्लांटमध्ये सांधेजोडावर टिटॅनिअम निओबिअम नायट्राइडडचे सात थरांचा मुलामा केला जातो.

या अनोख्या शस्त्रक्रियेबाबत मणिपाल हॉस्पिटल-गोवामधील सांधेजोड प्रत्यारोपण सल्लागार शल्यविशारद डॉ. रोहन देसाई म्हणाले, “ही रुग्ण तशी तरुणच होती आणि तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्यामध्ये सांध्यातील कुर्चाची (कार्टिलेज) मोठी झीज झाल्याने तीव्र वेदना (ऑस्टिओआर्थ्रिटीस) जाणवत होत्या. या नावीन्यपूर्ण गोल्ड नी प्रत्यारोपण तंत्राचा अवलंब करण्याचा आम्ही निर्णय घेतला. या तंत्रामध्ये सांधेजोडावर टिटॅनिअम निओबिअम नायट्राइडडचे सात थरांचा मुलामा केला जातो आणि त्यामुळे सांधेजोडाला सोनेरी रंग प्राप्त होतो. या थरामुळे शरीर आणि धातू यांच्यामध्ये एक अडसर तयार होतो आणि त्यामुळे धातूची अलर्जी किंवा त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका टाळता येतो. पारंपरिक गुडघाजोड शस्त्रक्रियेच्या तुलनेत या नव्या तंत्राची शस्त्रक्रिया आठपण किचटक, अवघड आहे, तरी त्यामुळे सांधेजोडामध्ये दीर्घकाळ वंगण राहते आणि थराच्या सिरॅमिक पृष्ठभागामुळे कमी घर्षण होत असल्याने हा सांधेजोड आयुष्यभर साथ देऊ शकतो. तसेच हा सांधेजोडे जैविकदृष्ट्याही शरीराशी जुळवून घेतो आणि त्यामुळेच त्याला बायोनिक नी असेही म्हटले जाते. या प्रत्यारोपणाबाबत रुग्णाचा प्रतिसाद उत्तम आणि आनंददायक आहे आणि यामुळे या रुग्ण महिलेच्या स्थितीत मोठी सुधारणा दिसून येत आहे.”

या प्रसंगी मणिपाल हॉस्पिटलमध्ये नी पेन क्लिनिकच्या शुभारंभाची घोषणा करताना मणिपाल हॉस्पिटल-गोवामधील वरिष्ठ आर्थोपेडिक शल्यविशारद डॉ. दीपचंद भंडारे म्हणाले, “गोमंतकीयांना मोठे लाभदायक ठरेल असे आणि सुलभपणे आरोग्य मार्गदर्शन मिळेल असे नी पेन क्लिनक सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. गोव्यामध्ये ओस्टिओआर्थ्रिटिसच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे आणि आता ही समस्या तरुण वर्गामध्येही दिसून येत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे श्रीमती गिता गोस्वामी होय. गुडघ्याला इजा झालेल्या रुग्णांना अनेकदा आम्हाला सामना करावा लागतो असतो, यातील अनेक रुग्ण हे खेळताना योग्य सावधगिरी किंवा उपाययोजना न बाळगल्यामुळे जखमी झालेले आहेत. गोव्यात अनेक सोशल क्लब फुटबॉलला प्रोत्साहन देतात आणि या खेळात इजा होणे ही एक सामान्य बाब बनली आहे. त्यामुळे खेळामुळे किंवा इतर कारणांमुळे गुडघ्याला झालेल्या इजेबाबत एक वरदान म्हणून हे नी पेन क्लिनिक ठरणार आहे.”

या प्रसंगी मणिपाल हॉस्पिटल्स गोवाचे युनिट प्रमुख श्री. मनीष त्रिवेदी म्हणाले, “या अनोख्या अशा शस्त्रक्रियेच्या माध्यमातून आरोग्यक्षेत्रात नवा मापदंड स्थापित करत आरोग्यसेवेचा आपला ध्यास मणिपाल हॉस्पिटल्स गोवाने पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. हॉस्पिटलच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा मैलाचा टप्पा ठरणार असून रुग्णांच्या सुरक्षेबाबत आमची कटिबद्धता यातून प्रतिबिंबित होते. किचकट पण महत्त्वाचे असे हे शस्त्रक्रिया तंत्रज्ञान गोवा व परिसरातील रुग्णांना उपलब्ध करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.”