मडगाव मध्ये उद्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची जाहीर सभा

0
637
गोवा खबर:दक्षिण गोव्याचे भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांच्या प्रचारासाठी उद्या 20 एप्रिल रोजी मडगाव येथील लोहिया मैदानावर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपच्या दोन्ही लोकसभा आणि तिन्ही विधानसभेच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
पंतप्रधान नरेद्र मोदी,केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी,वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू ,भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजयाताई राहाटकर,अभिनेत्री ईशा कोप्पीकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठीकठीकाणी जाहिर सभा पार पडल्या आहेत.
भाजप उमेदवारांच्या प्रचरात राज्यातील भाजप आघाडी सरकारचे घटक पक्ष असलेले गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष मंत्री आणि आमदारांनी साथ दिल्याने भाजपच्या उमेदवारांनी प्रचरात आघाडी घेतली असून पाचही निवडणुका भाजप जिंकेल,असा दावा भाजपचे सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी केला आहे.
उद्या सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या जाहीर सभेस भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत,उमेदवार नरेद्र सावईकर,दक्षिण गोवा प्रचार प्रमुख तथा पंचायत मंत्री माविन गुदींन्हो यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे नेते तथा उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई,अपक्ष आमदार प्रसाद गावकर,सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर,उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.