मडगाव बाजारपेठेतील व्यापारी सावईकर यांच्या पाठीशी:आजगावकर यांचा दावा

0
755
गोवा खबर:भाजपचे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार नरेंद्र सावईकर यांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोचला आहे. आज सावईकर यांनी मडगाव बाजारपेठेतील मतदारांच्या भेटी घेऊन आपला प्रचार केला.
 सावईकर यांना आज मडगावच्या बाजारपेठेत प्रचार करण्यासाठी उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांचे बंधु माजी नगरसेवक राजेंद्र आजगावकर यांची साथ लाभली.सावईकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह न्यू मार्केट आणि गांधी मार्केट ला भेट देऊन  प्रचार केला.या वेळी राजेंद्र आजगावकर,भाजपचे रुपेश महात्मे,नगरसेवक जाफर मोहमद आदी उपस्थित होते.
 सायंकाळच्या सत्रात सावईकर यांनी पेडावर आशीर्वाद घेऊन प्रचराला सुरुवात केली.गांधी मार्केटच्या काही भागात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे प्राबल्य आहे.त्यामुळे त्यांच्यावतीने बंधू राजेंद्र आजगावकर प्रचारात सहभागी झाले होते.यावेळी सुमारे साडेचारशे दुकानांना भेट देऊन पत्रके वाटण्यात आली.
आपल्याला मडगाव बाजारपेठेतुन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असल्याचे सावईकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री व्हावेत अशी प्रत्येकाची इच्छा आहे.त्यांचे हात बळकट करण्यासाठी दक्षिण आणि उत्तर गोव्यातून दोन्ही उमेदारांना दिल्लीत पाठवणे गरजेचे आहे ,असे आवाहन सावईकर यांनी यावेळी केले.मडगाव मधून आपणाला मोठया प्रमाणात मताधिक्य मिळणार आहे, असा विश्वास सावईकर यांनी व्यक्त केला.
 राजेंद्र आजगावकर यांनी सर्व दुकानदारांची ओळख यावेळी करुन दिली. संपूर्ण बाजारपेठ सावईकर यांच्या पाठीशी भाक्कमपणे आहे असे ते म्हणाले.
 मागील खासदारांनी केलेल्या विकास कामांची तुलना सावईकर यांच्या केवळ पाच वर्षाच्या कार्यकाळाशी करावी.तसेच त्यांना आणखी विकासकामे करण्यासाठी पुन्हा निवडून द्यावे असे आजगावकर म्हणाले.
सावईकर यांनी यावेळी बीफ आणि च्योरिस विक्री करणाऱ्या स्थानिक महिला विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.