मडगाव पालिकेसाठी प्रभाग 23 मधून भाजप समर्थक विवियन कार्दोज यांचा अर्ज दाखल

0
212
गोवा खबर : मडगाव नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग 23 मधून विवियन मामा कार्दोज यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
मडगाव नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाने व्हायब्रंट मडगाव पॅनल निवडणूक मैदानात उतरवले आहे. मडगावमधून 11 फातोर्डामधून 11 आणि कूडतरीमधून 3 मिळून 25 भाजपा समर्थक लढवत आहेत.
आज प्रभाग 23 मधून विवियन मामा कार्दोज यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी फातोर्डा भाजपा मंडळ अध्यक्ष मनोहर बोरकर, सरचिटणीस प्रमोद नाईक, भाजयुमो अध्यक्ष अमेय करमली यांच्यासह प्रभाग 9 च्या उमेदवार नर्मदा कुंडईकर आणि राज्य महिला मोर्चाच्या सचिव आणि कुडतरीमधील पालिका मतदारसंघाच्या प्रभारी डॉ. स्नेहा भागवत यावेळी उपस्थित होत्या.