मडगाव पणजी मार्गावरील ट्रॅफिक जाम वर लवकरात लवकर तोडगा काढा -शिवसेनेची मागणी

0
1146
पणजी:मडगाव- पणजी मार्गावर सध्या ट्रॅफिकची अतिशय दयनीय अवस्था आहे. इच्छित स्थळी पोहोचण्याकरिता लोकांना तसं तास ट्रॅफिक मध्ये अडकून राहावे लागते. दररोज प्रवेश करणाऱ्या चाकरमान्यांना व प्रवाशांना याचा होणार त्रास लक्षात घेता यावर यथोचित तोडगा काढण्याची मागणी शिवसेनेच्या उपाध्यक्ष राखी नाईक यांनी सरकारकडे केली आहे.
मांडावी नदीवर बांधण्यात येणाऱ्या तिसरा उड्डाणपूल आणि सदर ठिकाणच्या इतर उड्डाणपुलांमुळे काही फरक पडेल का याची उत्सुकता आहे. पणजी येथील कदंबा बस स्थानकासारख्या मोठ्या रहदारीच्या ठिकाणी, मडगाव-पणजी या राष्ट्रीय महामार्गाच्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बांधकामाचा अंदाज नाही घेतला गेला, की दुर्लक्ष केले गेले हा खरा प्रश्न आहे,असा मुद्दा नाईक यांनी उपस्थित केला आहे.
 मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, जे आपल्या नियोजनकौशल्याचे कौतुक स्वतःच करीत असतात, त्यांचे नियोजन कौशल्य हे उड्डाणपूल बांधताना कुठे गेले,
शिवसेना ही विकासाच्या विरोधात नाही. पुढे यामुळे फायदा होईलही कदाचित, परंतु आताचे काय,असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला आहे.
काही मार्गांवर तर परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे सांगून नाईक म्हणाल्या, ट्रॅफिकची वेळ नसतानाही काही रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उड्डाणपूल बांधणारे कॉन्ट्रॅक्टर आणि ट्रॅफिक पोलीस यांच्यात असलेला समन्वयाचा अभाव. रहदारी सुरु असताना उड्डाणपूल बांधकामास लागणारे दगड अचानक रस्त्यांवर ठेवले जातात आणि मग गाड्यांचा रांगा लागण्यास सुरुवात होते.
येणाऱ्या ख्रिसमस आणि नवीन वर्ष्याच्या स्वागताकरिता लाखो पर्यटक गोव्यात येतील, तेव्हा हा एक महत्वाचा प्रश्न होऊन बसेल. पर्यटकांच्या दृष्टिकोनातून विचार करता गोव्याबद्दल अतिशय वाईट समाज होण्याची शक्यता फार दाट असल्याने सरकारने याचा त्वरित विचार करून त्यावर तोडगा काढावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
झुआरी उड्डाणपुलावररुन विमानतळावर जाताना वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे अनेक प्रवाशांना वेळेत विमानतळावर पोचता येत नसल्याचे नजरेस आणून देत नाईक म्हणाल्या,
आताच खरी वेळ आहे, जेव्हा वाहतूक पोलिसांनी एक ठोस योजना आखण्याची गरज आहे. अंतर्गत मार्गिकांवरून काही भागात वाहतूक वळवता येतेय का याचा विचार वाहतूक खात्याने करायला हवा.  डिसेंबर महिन्याकरिता पुलाचे सर्व बांधकाम थांबवून वाहतुकीला असणारा अडथळा दूर करणे हा दूसरा मार्ग आहे संबंधीतांनी त्यातील योग्य तो मार्ग निवडून
राज्य सरकारने या महत्वाच्या विषयावर धरलेले मौन सोडावे आणि या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिक, प्रवासी आणि चाकरमान्यांना समोर येऊन उत्तर द्यावे अशी शिवसेनेची आग्रहाची मागणी आहे.