मडगाव खुनी हल्ल्यातील मास्टर माइंडला वाचविण्यासाठी भाजप अध्यक्ष व संघटन सचिव मडगावला धावले का: गोपाळ नाईक यांचा सवाल

0
1269
गोवा खबर: काल मडगावात दिवसा उजेडा झालेल्या खुनासाठी मडगावचे आमदार दिगंबर कामत व मडगांवकराना जबाबदार धरणाऱ्या भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा आम्ही तिव्र निषेध करतो. गोवा भाजपाचे ड्रग्स माफीया, भिकारी माफीया, मनी लाॅंडरींग माफीया यांच्याशी सबंध उजेडात येत असतानाच आता मर्डर माफीया भाजप चालवित आहे का व मडगावच्या खुनातील मास्टर माइंडला वाचवण्यासाठी भाजप अध्यक्ष व संघटन सचिव मडगावला काल धावुन आले होते का असा संतप्त सवाल मडगाव गट काॅंग्रेस अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी विचारला आहे.
 कालच्या खुनाला राजकीय वळण देण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना आज मडगावचे नगरसेवक व नागरीक यांनी चोख उत्तर दिले.
मडगावकर यापुढे मडगावचे नागरीक व आमदार दिगंबर कामत यांच्यावर केलेले खोटे व निराधार आरोप सहन करणार नसुन, भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेताल बोलणे बंद न केल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागणार असा इशारा माजी नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी दिला आहे.
भाजप गोव्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेपासुन लोकांचे मन विचलीत करण्यासाठी असले खोटे आरोप करीत असल्याचा दावा त्यांनी केला.
मडगावातील दिवसा उजेडा घडलेल्या खुन प्रकरणाने राज्यातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे सांगुन, सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी योग्य पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे माजी नगराध्यक्षा व नगरसेविका डाॅरिस टॅक्सेरा यांनी म्हटले आहे.
आज हातात आलेल्या अनधिकृत बातमींनुसार पोलीसांनी काही संशयीतांना अटक केल्याचे समजले आहे व सदर संशयीत हे चिंबल-सांताक्रुज भागातील असल्याचे समजते. याचा अर्थ अवघ्या काही दिवंसांमागे मेरशी येथील खुन प्रकरण ताजे असतानाच आता त्या भागातील गुन्हेगार मडगाव पर्यंत पोचणे हे धोक्याचे आहे. सरकारने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सर्वांवर कडक नजर ठेवणे गरजेचे आहे असे समाजसेवक सुरेंद्र हळदणकर म्हणाले.
म्हापसा येथे १८ सप्टेंबर २०१२ रोजी अशाच प्रकारे एका सोनाराचा दुकानात खुन झाला होता. परंतु, आज पर्यंत भाजप सरकारने त्या खुनाचा छडा लावला नाही असा आरोप नगरसेवक अविनाश शिरोडकर यांनी केला.
भाजपच्या दोन मंत्र्यातील वादाने मडगाव शहरात आज पोलिस उप-अधिक्षक पद खाली आहे. सॅराफीन डायस यांची अधिक्षकपदी बढती झाल्या पासुन सरकारने मडगाव सारख्या महत्वाच्या शहरात उप-अधिक्षकाची नेमणुक करू नये हे दुर्देवी आहे असे माजी नगरसेवक धनंजय उर्फ दादी मयेकर यांनी म्हटले आहे.
आज भाजप सरकार आपल्या नाकर्तेपणाचे खापर मडगावातील गरीब लोकांवर फोडण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु रेव्ह पार्टित दंगा मस्ती करणारे उच्चभ्रु लोकांना मात्र सरकार संरक्षण देत आहे असा आरोप नगरसेवक मनोज मसुरकर यांनी केला.
काल समाज माध्यमांवर मडगावचे आमदार दिगंबर कामत व मडगावच्या नागरीकांची बदनामी करणारे अनेक व्हिडीओ, फोटो अनेक बेजबाबदार नागरीकांनी टाकले आहेत . याची पोलीसांनी चौकशी करावी अशी मागणी समाजसेवक सगुण उर्फ दादा नायक यांनी केली आहे.
नगरसेवक दामोदर नाईक यानी मडगावच्या आमदारांना टार्गेट करण्याच्या भाजपच्या कृतीचा निषेध केला आहे. माजी नगरसेवक लक्ष्मिकांत कामत व समाजसेवक मॅथ्यू फर्नांडिस यांनी सरकारने कायदा सुव्यवस्था सांभाळावी अशी मागणी केली आहे.