मडगावात एटीएम मशीनमध्ये हेराफेरी करणाऱ्या 2 रोमानीयन नागरीकांना अटक

0
1053
 गोवा खबर:मडगाव येथील एसबीआयच्या एटीएम मशीन मध्ये स्किमर बसवून मिळालेल्या डाटाच्या आधारे पैसे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रोमानीयन नागरीकांचा फिल्मी स्टाइलने भल्या पहाटे पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात मडगाव पोलिसांनी यश मिळवले आहे.यापूर्वी देखील पर्वरी परिसरात अशाच प्रकारे एटीएम मध्ये हेराफेरी केल्या प्रकरणी दोन रोमानीयन नागरीकांना अटक करण्यात आली आहे.एटीएम मशीन चोरुन नेण्याचे प्रकार देखील घडले असल्याने एटीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पॉल वासिल (35)आणि एमायेल काबो(40) हे दोघे रोमानीयाचे नागरिक असून एटीएम मध्ये स्किमर बसवून डाटा चोरायचा आणि त्याच्या आधारे पैसे काढायचे असा त्यांचा धंदा होता.आज मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मडगाव  येथील बस स्थानका शेजारी आशिया कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मडगाव येथील एटीएम मशीन मधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होते.
रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद हालचाली वाटल्याने त्यांनी तेथे धाव घेतली असता दोघांनी तेथून आपल्या वाहनांमधून पळ काढला.मडगाव पोलिसांनी रात्री फिल्मी स्टाइलने दोघांचा पाठलाग केला. बऱ्याच वेळाने एकाल वेर्णा परिसरात तर दुसऱ्याला कुठ्ठाळी येथून ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या.