मडगावातील ऊर्जा वेलनेस सेंटरला नाभची मान्यता

0
1299
गोवा खबर:ऊर्जा वेलनेस सेंटर ही आयुर्वेद वैद्यकीय क्षेत्रातील सेवा पुरवणारी मडगावमधील संस्था गोव्यात नाभ या क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया द्वारा नियंत्रित प्रणालीची मान्यता प्राप्त करणारी पहिलीच संस्था ठरली आहे.
 नाभची मान्यता मिळवण्यासाठी कठोर चाचण्यांना सामोरे जावे लागते. तसेच नियम व निकष यांचे काटेकोरपणे पालन करत सेवा द्यवी लागते. त्यांच्या निकषास पात्र ठरल्यामुळेच ऊर्जा वेलनेस सेंटरची दखल घेण्यात आली आहे.
पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानावर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ऊर्जा वेलनेस सेंटरच्या संचालिका स्नेहा भागवत यांना मान्यता पत्र प्रदान केले.
यावेळी ऊर्जा वेलनेस सेंटरचे कौतुक करताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, जास्तीत जास्त आयुर्वेदिक डॉक्टरांनी अशाप्रकारची मान्यता मिळवली पाहिजे, जेणेकरून रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा गोव्यात उपलब्ध होईल.
 ऊर्जा वेलनेस सेंटर हे अशा प्रकारची मान्यता मिळवणारे गोव्यातील पहिलेच पंचकर्म सेंटर बनले आहे. या ठिकाणी रुग्णांसाठी सर्व रोगांवर उपचार, पंचकर्म सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.शिवाय योग वर्ग, बाह्यरुग्ण विभाग तसेच परदेशी रुग्णांसाठी निवासी उपचाराची सोय उपलब्ध आहे. नाभची मान्यता मिळाल्यामुळे उपचारांचा खर्च विम्याद्वारे घेणाऱ्या लोकांसाठी खुपच सोपे व सोईचे होईल,अशी माहिती संचालिका डॉ.स्नेहा भागवत यांनी दिली आहे.