मच्छिमारी स्पर्धेसाठी नाविकांना सूचना

0
336

गोवा खबर:आल्त पर्वरी येथील  रीकेश हळर्णकर आणि जेनेविव डिसौजा यानी १ मार्च रोजी दुपारी २.३० ते संध्या ४.३० वाजेपर्यंत मांडवी नदीत जुन्या सचिवालयासमोर मच्छिमारी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

      वरील काळात मांडवी नदीतून जलवाहतूक करताना बार्जेस, प्रवासी लॉंच, फेरीबोटी, मच्छिमारी बोटी, होडी,  पर्यटक बोटी आणि इतर सर्व बोट चालकानी यांत्रिकी आणि बिन यांत्रिकी नाविकानी स्पर्धकाना कोणताही अडथळा होऊ नये म्हणून नजर स्थीर ठेऊन सावकाश आणि गस्त बोटीकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करून सुरक्षित अंतरावरून वाहतूक करण्याचा आदेश बंदर खात्याने दिला आहे.