मगो बनली ढवळीकरवादी पार्टी;पक्षात अध्यक्षांची एकाधिकारशाही;लवूंची डरकाळी

0
1047

सरकारला दिलेले पाठिंब्याचे पत्र म्हणजे मोठा फ्रॉड
गोवा:केंद्रीय कार्यकारीणीला अंधारात ठेवून अध्यक्ष दीपक ढवळीकर एकाधिकारशाही गाजवत असून त्यात बदल झाला नाही तर मगो पक्षाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही,असा इशारा मगोचे सरचिटणीस माजी आमदार लवू मामलेदार यांनी ढवळीकर बंधूना दिला आहे.
मगो पक्षात सध्या ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर हे पक्षाला दुय्यम ठरवत आपल्या हीताचे निर्णय घेत असल्याची भावना केंद्रीय कार्यकारिणी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये बनली आहे.आज मामलेदार यांनी मगो आता ढवळीकर वादी पक्ष बनला असल्याची टिका करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
मामलेदार यांनी दीपक ढवळीकरांवर केले सनसनाटी आरोप
गेल्या वर्षी 12 मार्च पासून दीपक ढवळीकर यांची अध्यक्ष म्हणून असलेली मनमानी आणखीच वाढली असे सांगून मामलेदार म्हणाले,आता पर्यंत ढवळीकर यांनी मनमानी करत 36 निर्णय स्वतःच्या मनाने घेतले आहेत.अगदी केंद्रीय कार्यकारीणीला देखील आता किंमत राहिलेली नाही.फोंड्यात भाषा सुरक्षा मंचच्या केतन भाटीकर असो की शिवसेनेच्या माजी राज्य प्रमुखांना पक्षात घेताना सहकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते मात्र तेवढी सुद्धा तसदी घेतली जात नाही.भाजप मध्ये मगो पक्ष विलीन करण्यासंदर्भात कारस्थान रचणे आणि बाहेरील लोकांना पक्षात घेण्याची चाललेली घाई बघितली तर ढवळीकर मगो पक्ष संपवण्याच्या ईराद्याने काम करत आहेत असे स्पष्ट जाणवते.
सत्ता स्थापने वेळी ढवळीकर यांनी राज्यपाल आणि सभापतींना दिलेले पत्र म्हणजे मोठा फ्रॉड असल्याचा आरोप मामलेदार यांनी केला आहे.समर्थनाचे पत्र देण्यापूर्वी तसा ठराव पक्षात घेणे आवश्यक आहे.मात्र त्याला फाटा देऊन ढवळीकर यांनी राज्यपाल आणि सभापतींना दिलेले पत्र बेकायदेशीर असून तो मोठा फ्रॉड आहे.दीपक ढवळीकर आणि सुदिन ढवळीकर हे दोघे मिळून पक्ष मनमानी करून चालवत असून कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हे प्रकार असेच चालू राहिले तर पक्ष संपायला वेळ लागणार नाही अशी भीती देखील मामलेदार यांनी बोलून दाखवली.