मंत्रीपद गेल्याने ढवळीकरांची अवस्था पाण्यावीन मछली सारखी:सावकार

0
788

 

गोवा खबर :भाजपा सरकारात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या सुदिन ढवळिकर यांना मंत्री पदावरुन बडतर्फ केल्यानंतर “पाण्याविना मछली “अशी त्यांची अवस्था झाली आहे. मंत्रीपदाशिवाय ढवळीकर बंधू राहु शकत नाहीत. त्याच रागातून त्यांनी शिरोडा मतदारसंघात ज्याना मतदानाचा हक्क नाही अशा मतदारसंघा बाहेरच्या उमेदवारासाठी मतांचा जोगवा मागत  फिरावे लागत आहे. शिरोड्याचे मतदार सुशिक्षीत आहेत. त्यांना तुमच्या स्वार्थी मार्गदर्शनाची गरज नाही. जर  शिरोडावासीयांचा एवढा पुळका होता तर गेली वीस वर्षे कुठल्या राज्यात होता, असा सवाल पंच सुनील सावकार यांनी मट्येवाडा- तामशिरे येथील श्री वाटदेव मंदिरासमोर झालेल्या बैठकीत केला.

अजुन पर्यंत शिरोडा,बोरी,बेतोडा येथे पाणी  चोवीस तास पाणी मिळत नाही.त्यावर आपण येथे 24 तास पाणी देणार असल्याचे आश्वासन दोन वर्षांपूर्वी परत एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळाल्यानंतर ढवळीकर यांनी दिले होते. ते आश्वासन पुर्ण करता न आल्यानेच कमी दर्जाच्या टाक्या वाटुन जनतेच्या तोंडाला पाने फुसण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप  सावकार यांनी केला.
 यावेळी व्यासपीठावर उमेदवार सुभाष शिरोडकर,पंच तुकाराम नाईक ,पंच रामदास नाईक,पंच कमलाकांत गावडे,माजी सरपंच मनुराय नाईक उपस्थीत होते. स्वागत वासुदेव नाईक यांनी केले तर प्रास्ताविक माजी सरपंच मनुराय नाईक यांनी केले.
 यावेळी पंच तुकाराम नाईक यांनी भाजपाचे उमेदवार सुभाष शिरोडकर हे स्थानिकांना जवळचे असून ते दिवसाचे २४ तास स्थानिकांसाठी उपल्बध असतात.शिरोडकर यांनी फक्त विकासाचा ध्यास घेतला आहे. मतदारसंघाबरोबर  सामाजिक विकास घडवण्यासाठी सर्वानी  शिरोडकर यांनाच मतदान करुन निवडुन देण्याचे आवाहन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना सुभाष शिरोडकर यांनी ढवळीकर बंधूवर  टिका करून त्यांनी चालवलेला अपप्रचाराचा समाचार घेतला. बहुजन समाजाला लाचार बनवण्याचा प्रयत्न साध्य होऊ देणार नाही. माझ्या जमिनीच्या  व्यवहाराची चौकशी सुसंस्कृत नागरिकांनी जरूर करावी.मात्र समाजाविरोधी असलेल्या ढवळीकर यांच्या सारख्याने गेली २० स्वार्थी राजकारण करणाऱ्या भ्रष्टाचारी माणसाने करु नये. तुमचे कारभार सगळ्यांना कळुन चूकले आहेत, असे शिरोडकर म्हणाले.
 यापुढे मडकई मतदारसंघात बहुजन समाजाच्या उमेदवाराला बरोबर घेउन फिरुन मडकई मतदारसंघ लाचार व भ्रष्टाचारमुक्त करणार असे सांगुन विकासासाठी परत निवडून आणण्याचे आवाहन शोरोडकर यांनी केले.
  संदिप नाईक यांनी आभार मानले. बैठकीला समाजसेवक उद्योजक प्रकाश उत्तम नाईक,माजी उपसरपंच सुभाष पारपती,वाड्यावरील ज्येष्ठ ग्रामस्थ महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.