भ्रष्टाचार कबुली प्रकरणी मंत्र्यांची चौकशी करावी: आपचे एसीबीलाआवाहन

0
667
गोवा खबर:आम आदमी पक्षाचे संयोजक एल्विस गोम्स यांनी सोमवारी आल्तिनो पणजी येथील दक्षता विभागाच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेत जाऊन ‘गोव्यातील सर्व 40 आमदार भ्रष्ट आहेत’ अशा प्रकारचे प्रसारमाध्यमातून मंत्र्यानी जे उघड विधान केले होते त्याची दखल घ्यावी म्हणून चौकशी अधिकाऱ्यांसमोर साक्ष दिली व संबंधितांवर योग्य कारवाई करण्याचा आग्रह केला. त्यांच्यासमवेत आपचे पदाधिकारी प्रदीप पाडगावकर, सुनील सिग्नापूरकर, वाल्मिकी नाईक, ब्रुनो फर्नांडिस आदी उपस्थित होते.
एसीबी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोम्स यांनी अलिकडच्या काळात मंत्री, बाबू आजगावकर आणि मायकल लोबो, हे एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप – प्रत्यारोप करीत होते आणि त्यातून एकाने राज्यातील सर्व 40 आमदार भ्रष्ट आहेत असे म्हटले होते याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, ‘आप’ला असे वाटले होते की हे मंत्री ज्या यंत्रणेचे एक भाग आहेत ते त्यांच्या अनधिकृत वक्तव्यांद्वारे त्याच यंत्रणेला आव्हान देत आहेत. म्हणूनच आपण या कथित भ्रष्टाचाराचा उलगडा व्हावा यासाठी पत्र लिहून त्याची चौकशी करावी व खरे काय हे शोधुन काढावे असे आवाहन एसीबीकडे केले होते.
 “आम्ही जे पत्राद्वारे कळवले होते, त्यानुसार मी माझे विधान केले. मंत्री स्वत: सरकारचा भाग आहेत. भारतीय राज्यघटनेची आणि कायद्याच्या अंमलबजावणीची शपथ घेतलेल्या मंत्र्यानी मान्य केलेल्या भ्रष्टाचाराच्या विधानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आता मंत्री, आमदार आणि त्यांच्याकडे निगडीत असलेल्या व्यक्तींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या व्याप्तीची सत्यता शोधणे तपास यंत्रणेचे काम आहे, गोम्स म्हणाले.
 गोम्स म्हणाले , लोकायुक्त जी एक  भ्रष्टाचार विरोधक संस्था आहे त्यानी अलीकडेच फक्त देवच गोव्याचे रक्षण करू शकेल असे सांगून गोवा सरकारवर ताशेरे ओढले होते. “हे दर्शवते की गोवा देशातील भ्रष्टाचार निर्देशांकात उच्च स्थानावर आहे आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी असलेल्या सर्व सोयी-साधने खाऊन टाकत आहे.
 एसीबीसारख्या संस्थांना ‘आप’ स्वायत्तता देईल आणि राजकीय कार्यकारिणीच्या दबावापासून मुक्त ठेवेल असे,गोम्स म्हणाले.