भाषामाध्यमाच्या विषयामुळे मगो 3 उमेदवार हरले-ढवळीकर

0
909

भारतीय भाषा सुरक्षा मंचने हाती घेतलेल्या भाषा माध्यमाच्या विषयाला समर्थन दिल्यामुळे मगोचे महत्वाचे नेते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाला असे मगो नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज स्पष्ट केले. मगो आणि गोवा फॉरवर्ड यांनी पुढाकार घेऊन मनोहर पर्रिकर यांना सरकार बनवण्यासाठी राजी केले होते त्यामुळे आज पर्रिकर निवडणूक लढवत असताना त्यांना पाठिंबा देणे आमचे कर्तव्य ठरते असे ढवळीकर म्हणाले.पणजी मधून पर्रिकर आणि वाळपई मधून विश्वजीत राणे जास्तीत जास्त मतांनी निवडून यावेत यासाठी मगो कार्यकर्ते प्रयत्न करणार असल्याचे ढवळीकर म्हणाले.पर्रिकर हे साडे तीन ते 5 हजार तर राणे सुमारे 4 हजार मतांनी निवडून येतील असे ढवळीकर म्हणाले.गणेशोत्सवामुळे मतदान कमी होणार असल्याची भीती ढवळीकर यांनी व्यक्त केली. गोव्यात इतर भाषिक लोक वाढल्या मुळे भाषा माध्यमाचा विषय गैरलागू ठरला असल्याचा दावा ढवळीकर यांनी केला.