भारत, साओ तोमे आणि प्रिन्सीप यांच्यात पारंपरिक औषध पद्धती आणि होमीओपॅथी क्षेत्रात सहकार्य करण्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

0
1194

गोवा खबर :  पारंपरिक औषध पद्धती आणि होमीओपॅथी क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत भारत आणि साओ टोमे आणि प्रिन्सीप यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी देण्यात आली. मार्च 2018 मधे या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

प्रभाव:

या सामंजस्य करारामुळे पारंपरिक औषध पद्धती क्षेत्रात उभय देशात सहकार्य वृद्धींगत होईल.

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्ट:

स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराची प्रत मिळाल्यानंतर दोन्ही बाजूनी कार्यवाही सुरु होईल. सामंजस्य करारातल्या संदर्भाप्रमाणे दोन्ही देश कामाला सुरुवात करतील आणि हा सामंजस्य करार अस्तित्वात असेपर्यंत ही प्रक्रिया सुरुच राहील.

पूर्वपीठीका:

भारताला वनौषधींसह पारंपरिक औषध पद्धतीचे वरदान लाभले आहे. जागतिक आरोग्य क्षेत्रात याला मोठा वाव आहे.

आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध यासारख्या पारंपरिक आयुर्वेद पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पारंपरिक औषध पद्धतीचा जगभरात प्रसार करण्यासाठी आयुष मंत्रालय कार्यरत असून, मलेशिया, त्रिनिनाद आणि टोबॅगो, हंगेरी, बांगलादेश, नेपाळ, मॉरीशस इराण या देशांशी भारताने पारंपरिक औषध क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केले आहेत. श्रीलंकेसमवेतही या क्षेत्रात असा करार प्रस्तावित आहे.