भारत सरकारने ‘म्यानमार’ मधून अपहरण झालेल्या पाच भारतीय नागरिकांची केली सुटका

0
932

 

 

 गोवा खबर:भारत सरकारच्या योग्य वेळी केलेल्या हस्तक्षेपामुळे म्यानमारमधल्या राखीन राज्यात ‘अराकान आर्मी’ने अपहरण केलेले पाच भारतीय नागरिक, म्यानमारचा एक संसद सदस्य आणि म्यानमारच्या इतर चार नागरिकांची 4 नोव्हेंबरच्या पहाटे सुखरुप सुटका झाली.

3 नोव्हेंबर रोजी या सर्वांचे ‘अराकान आर्मी’ ने अपहरण केले होते. अपहरण केलेले पाच भारतीय सध्या म्यानमारमधल्या कलदन रस्ते प्रकल्पात कार्यरत होते.

दुर्देवाने, एका भारतीय नागरिकाचे ‘अराकान आर्मी’च्या ताब्यात असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुटका झालेले उर्वरित भारतीय नागरिक या नागरिकाच्या मृतदेहासह सितवे येथे पोहोचले आहेत. हे सर्व यंगून मार्गे भारताकडे रवाना होतील.