भारत-बांग्लादेशदरम्यान विविध सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

0
1033
The Prime Minister, Shri Narendra Modi and the Prime Minister of Bangladesh, Ms. Sheikh Hasina, at the Joint Press Statements, at Hyderabad House, in New Delhi on October 05, 2019.

 गोवा खबर:बांग्लादेशच्या पंतप्रधान भारत भेटीवर आल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीत भारत आणि बांग्लादेश यांच्या दरम्यान करण्यात आलेल्या सामंजस्य करारांची सूची 

अनुक्रम – 1.

सामंजस्य कराराचे शीर्षक – चट्टोग्राम आणि मोंगला बंदराच्या वापरासाठी मानक कार्यप्रणाली (एसओपी)

बांग्लादेशच्या वतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था – भारतातले बांगलादेशाचे उच्चायुक्त सईद मौझिम अली.

भारताच्यावतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था –  जहाज मंत्रालयाचे सचिव गोपाल कृष्ण.

अनुक्रम – 2.

सामंजस्य कराराचे शीर्षक – भारतातल्या त्रिपूरामधल्या सबयम शहराला पेयजल पुरवठा योजनेसाठी फेनी नदीतून 1.82 क्यूसेक्स पाणी  मागे घेण्याचा करार.

बांग्लादेशच्या वतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था – जल स्त्रोत मंत्रालयाचे सचिव कबीर बिन अन्वर.

भारताच्यावतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था –  जल स्त्रोत मंत्रालयाचे सचिव उपेंद्र प्रसाद सिंह.

अनुक्रम – 3.

सामंजस्य कराराचे शीर्षक – जीओआय लाईन ऑफ क्रेडिटस् (एलओसी) बांगलादेशापर्यंत विस्तारित करण्यासंबंधी करार

बांग्लादेशच्या वतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था – वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विषयक विभागाचे संयुक्त सचिव शहरियार कादेर सिद्दिकी

भारताच्यावतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था –  बांगलादेशातल्या भारताच्या उच्चायुक्त रिवा गांगुली दास.

अनुक्रम – 4.

सामंजस्य कराराचे शीर्षक – हैदराबाद आणि ढाका विद्यापीठांच्या दरम्यान सामंजस्य करार

बांग्लादेशच्या वतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था – ढाका विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मोहम्मद अख्तरूझमाम.

भारताच्यावतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था –  बांगलादेशातल्या भारताच्या उच्चायुक्त रिवा गांगुली दास.

अनुक्रम – 5.

सामंजस्य कराराचे शीर्षक – सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाचे नूतनीकरण

बांग्लादेशच्या वतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था – सांस्कृतिक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. अबू हेना मोस्तोफा कमाल.

भारताच्यावतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था –  बांगलादेशातल्या भारताच्या उच्चायुक्त रिवा गांगुली दास.

अनुक्रम – 6.

सामंजस्य कराराचे शीर्षक – युवा व्यवहार सहकार्य सामंजस्य करार

बांग्लादेशच्या वतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था – युवा आणि क्रीडा मंत्रालय सचिव मोहम्मद अख्तर होसैन.

भारताच्यावतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था –  बांगलादेशातल्या भारताच्या उच्चायुक्त रिवा गांगुली दास.

अनुक्रम – 7.

सामंजस्य कराराचे शीर्षक – सागरी किनारपट्टीवर पाळत, दक्षता ठेवणारी यंत्रणा पुरवण्याबाबत सामंजस्य करार

बांग्लादेशच्या वतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था – गृह मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव मोस्तफा कमाल उद्दिन

भारताच्यावतीने स्वाक्षरी करणारी व्यक्ती अथवा संस्था –  बांग्लादेशातल्या भारताच्या उच्चायुक्त रिवा गांगुली दास.